आपटेनगरात एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:16+5:302021-05-05T04:40:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : किरकोळ कारणावरून रविवारी रात्री आपटेनगरात एकास दगडाने मारहाण झाली. चंद्रकांत बुधाजी कोटगी (वय ४०, ...

आपटेनगरात एकास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : किरकोळ कारणावरून रविवारी रात्री आपटेनगरात एकास दगडाने मारहाण झाली. चंद्रकांत बुधाजी कोटगी (वय ४०, रा. आपटेनगर) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चौघावर गुन्हा दाखल झाला. जखमी चंद्रकांत कोटगी यांनी दिलेल्या तक्रारीवरून किशोर पाटील, मारुती पाटील, प्रथमेश मोरे व त्याचे वडील अशी त्याची नावे आहेत.
पशुवैद्यकीय निवासस्थानात चोरी
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या शासकीय निवासस्थानातील चोरट्याने सिलिंग पंखे चोरून नेले. हे निवासस्थान गेली दोन वर्षे वापरात नाही. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याबाबतची तक्रार डॉ. सॅम संतान लुद्रिक (रा. उचगाव) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली.
शेंडा पार्कात दोघांना मारहाण
कोल्हापूर : स्वाधारनगर, शेंडा पार्क परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले. विक्रम कांबळे आणि महादेव वराळे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर गुन्हा नोंद झाला. जावेद सरदार जमादार, जुबेर सरदार मुजावर, जमीर सरदार मुजावर (सर्व रा. शेंडा पार्क) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.