अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:14+5:302021-07-14T04:29:14+5:30
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला रायगड कॉलनीत एका खोलीत नेऊन तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी पलायन केलेल्यास ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला रायगड कॉलनीत एका खोलीत नेऊन तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी पलायन केलेल्यास करवीर पोलिसांनी बागलकोट जिल्ह्यातील मुधळ येथून अटक केली. श्रीकांत संभाजी गायकवाड (वय ३०, रा. यादवनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गायकवाड याच्यावर गुन्हा नोंदवला. गायकवाड याचा सहकारी संजय प्रकाश कोळेकर (रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) ने संबंधित मुलीकडून २ लाख ३० हजार रुपये घेऊन रायगड कॉलनीतील घराच्या वरच्या मजल्यावरील खोली गहाणवट नोटरी करून घेऊन फसवणूक केली. त्याबद्दल संबंधित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन दोघांवरही गुन्हा नोंदवला. त्यानुसार पोलिसांनी श्रीकांत गायकवाड याला अटक केली. पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विक्रांत पाटील हे तपास करत आहेत.
फोटो नं. १२०७२०२१-कोल-श्रीकांत गायकवाड (आरोपी)
120721\12kol_13_12072021_5.jpg
फोटो नं. १२०७२०२१-कोल-श्रीकांत गायकवा (आरोपी)