गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठाप्रकरणी एकजण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST2020-12-26T04:21:14+5:302020-12-26T04:21:14+5:30
इचलकरंजी : बंदी आदेश असतानाही येथील रिंग रोडवर असलेल्या पानपट्टीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा केल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक बाबुराव ...

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठाप्रकरणी एकजण अटकेत
इचलकरंजी : बंदी आदेश असतानाही येथील रिंग रोडवर असलेल्या पानपट्टीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा केल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या पथकाने छापा टाकून एकास अटक केली. इम्तियाज मेहबूब पठाण (वय २५, रा. सुतार मळा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दहा हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, रिंग रोडवर असलेल्या एका पानपट्टीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला. त्यामध्ये विविध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा दहा हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळीक, महेश कांबळे, संग्राम खराडे, सचिन चौगुले व विक्रम मोरे यांनी केली.