निपाणीतील कारागीर खूनप्रकरणी एकास अटक; साथीदार फरार
By Admin | Updated: May 7, 2014 13:34 IST2014-05-06T22:07:23+5:302014-05-07T13:34:21+5:30
निपाणी : निपाणी येथील फर्निचर कारागीर सागर दिनकर सुतार (रा. मगदूम गल्ली) या युवकाचा १८ एप्रिल रोजी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्याप्रकरणी निपाणी येथील मुगळे गल्ली येथील त्याचा मित्र संदीप अर्जुन महाजन (वय ३२) याला निपाणी पोलिसांनी इचलकरंजी येथून अटक केली आहे. त्याने सागर सुतार याचा खून केल्याची कबुली मंगळवारी (आज) पोलिसांना दिली.

निपाणीतील कारागीर खूनप्रकरणी एकास अटक; साथीदार फरार
निपाणी : निपाणी येथील फर्निचर कारागीर सागर दिनकर सुतार (रा. मगदूम गल्ली) या युवकाचा १८ एप्रिल रोजी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्याप्रकरणी निपाणी येथील मुगळे गल्ली येथील त्याचा मित्र संदीप अर्जुन महाजन (वय ३२) याला निपाणी पोलिसांनी इचलकरंजी येथून अटक केली आहे. त्याने सागर सुतार याचा खून केल्याची कबुली मंगळवारी (आज) पोलिसांना दिली.
सागर सुतार हा निपाणीसह परिसरात फर्निचरचे काम करीत होता. १८ एप्रिल रोजी सायंकाळी त्याचा मित्र संदीप महाजन आणि प्रशांत गुरव (महात गल्ली) हे तिघेजण एका बारमध्ये दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर संदीप व प्रशांत यांनी त्याला पल्सर दुचाकीवरून निपाणी शहराबाहेरील चिकोडी रोडवरून जनावरांच्या बाजाराजवळ नेले.
घटनास्थळी पुन्हा मद्य प्राशन करून संदीप व प्रशांत या दोघांनी सागर सुतार याच्या डोक्यात दगड घालून रात्री खून केला. शिवाय मृतदेह कोणालाही दिसू नये म्हणून पुलाखाली ढकलण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर संशयित संदीप महाजन आणि प्रशांत गुरव दोघेही फरारी झाले होते. संकेश्वर पोलिसांनी संदीप महाजन याला इचलकरंजी येथे सापळा रचून अटक केली. त्यानंतर त्याला निपाणी न्यायालयासमोर हजर केले. दुसरा आरोपी प्रशांत गुरव याला लवकरच अटक करण्यात यश येईल, असे मत सीपीआय महेश्वर गौडा यांनी व्यक्त केले. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
प्रतिनिधी
फोटो - 06निपाणी - एडीटवर.