मोटारसायकल चोरीप्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:41+5:302021-07-08T04:17:41+5:30
इचलकरंजी : संजय फौंड्रीजवळून मोटारसायकल चोरून नेलेल्या एकास शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (दि. ६) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले ...

मोटारसायकल चोरीप्रकरणी एकास अटक
इचलकरंजी : संजय फौंड्रीजवळून मोटारसायकल चोरून नेलेल्या एकास शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (दि. ६) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रामा अशोक कोरवी (वय २५, रा. कोरोची, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार महेश बसाप्पा कोष्टी यांनी दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, १ जुलैला महेश कोष्टी यांची मोटारसायकल (एमएच ११ एस ८६०९) चोरीस गेली होती. त्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रामा व त्याचा साथीदार नागेश हणमंत शिंदे (रा. कोरोची) यांनी मोटारसायकल चोरल्याचे समजले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता शहापूर हद्दीतील खोतवाडी (ता. हातकणंगले) येथून आणखीन एक मोटारसायकल चोरल्याचे त्यांनी सांगितले. या चोरी प्रकरणातील नागेश हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.