पंधरा सिलिंडर बाळगल्याप्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST2021-08-14T04:29:34+5:302021-08-14T04:29:34+5:30

मंगळवार पेठेतील राधाकृष्ण मंदिरामागे पत्र्याच्या शेडमध्ये रिक्षासह अन्य वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरणा करून दिला जात आहे. याबाबतची माहिती ...

One arrested for carrying 15 cylinders | पंधरा सिलिंडर बाळगल्याप्रकरणी एकास अटक

पंधरा सिलिंडर बाळगल्याप्रकरणी एकास अटक

मंगळवार पेठेतील राधाकृष्ण मंदिरामागे पत्र्याच्या शेडमध्ये रिक्षासह अन्य वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरणा करून दिला जात आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खातरजमा करून शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. यावेळी संशयित शेख यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये १५.४ किलो वजनाच्या १५ गॅस सिलिंडर टाक्या आढळून आल्या. या टाक्या संशयिताने रिक्षांमध्ये अवैधरीत्या गॅस भरण्यासाठी बाळगल्याचे आढळून आले. गॅस ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ आहे. हे माहीत असतानाही स्वत:च्या व इतर लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला. याबाबतची फिर्याद सुनील बाबुराव आमते (जुना राजवाडा पोलीस हवालदार) यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला. यावेळी ९ भरलेल्या व सहा रिकाम्या अशा एकूण १५ सिलिंडर टाक्या व इलेक्ट्रिक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार, रबरी पाईप, रेग्युलेटर असा ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास अंमलदार मोरे करीत आहेत.

Web Title: One arrested for carrying 15 cylinders