शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात सव्वा लाख वाहने फास्टॅगविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 17:39 IST

Fastag Toll -गेल्या दीड महिन्यात किणी टोलनाक्यावरून १ लाख १८ हजार ७५१, तर तासवडे टोलनाक्यावरून १ लाख २९ हजार २२९ वाहने रोख मार्गिका अर्थात फास्टॅगविना गेली आहेत. या टोलनाक्यावर मध्यरात्रीपासून तीन मार्गिका फास्टॅग, तर एक हायब्रिड मार्गिका सुरु झाली आहे. ज्या वाहनांना फास्टॅग नसेल, त्यांना मध्यरात्रीपासून दुप्पट टोल आकारला जाणार आहे.

ठळक मुद्देदीड महिन्यात सव्वा लाख वाहने फास्टॅगविना मध्यरात्रीपासून किणी, तासवडे टोलनाक्यावरील चारही मार्गिका फास्टॅग : दुप्पट टोल

कोल्हापूर : गेल्या दीड महिन्यात किणी टोलनाक्यावरून १ लाख १८ हजार ७५१, तर तासवडे टोलनाक्यावरून १ लाख २९ हजार २२९ वाहने रोख मार्गिका अर्थात फास्टॅगविना गेली आहेत. या टोलनाक्यावर मध्यरात्रीपासून तीन मार्गिका फास्टॅग, तर एक हायब्रिड मार्गिका सुरु झाली आहे. ज्या वाहनांना फास्टॅग नसेल, त्यांना मध्यरात्रीपासून दुप्पट टोल आकारला जाणार आहे.केंद्र सरकारने देशातील सर्व टोलनाक्यांवरून जा-ये करणाऱ्या चारचाकी वाहनांना टोल भरणा रोखीऐवजी फास्टॅगच्या माध्यमातून ई-पेमेंट भरणा करणे बंधनकारक केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम ३१ डिसेंबर २०२० ही तारीख निश्चित केली होती.

सर्वच ठिकाणी लाखो वाहनधारकांनी हे फास्टॅग कोड घेतले नव्हते. या कारणावास्तव १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ केंद्र शासनाने दिली होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून टोल नाक्यांवर फास्टॅग कोड स्टीकर नसेल तर त्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कोल्हापूर विभागांतर्गत किणी टोलनाक्यावरून रोज १९ हजार ६४७ वाहने ये-जा करतात. त्यापैकी १५ हजार ७४२ वाहने फास्टॅग, तर ३ हजार ९०५ वाहने विना फास्टॅग अर्थात रोख टोल भरून जात होती. अशीच परिस्थिती तासवडे टोलनाक्यावरही आहे.

यात अनुक्रमे रोज २१ हजार ७६० वाहने ये-जा करतात. त्यापैकी १७ हजार ७६९ वाहने फास्टॅगद्वारे, तर ३ हजार ९९१ वाहने विना फास्टॅग जात होती. सोमवारी मध्यरात्रीपासून या दोन्ही टोलनाक्यांवरील मार्गिकांमधील तीन मार्गिका पूर्णपणे फास्टॅग, तर एक मार्गिका हायब्रीड अर्थात रोख आणि फास्टॅग अशी केली आहे. जे टोल रोख भरतील त्यांना दुप्पट टोल आकारला जाणार आहे.दीड महिन्यातील स्थिती अशी,

  • टोलनाका फास्टॅग ई-पेमेंट रोखीत भरणा (फास्टॅगविना)
  • किणी (वाहन संख्या ५ लाख ७३ हजार २४६ ६ हजार ६४ १ लाख १८ हजार ७५१
  • तासवडे (वाहन संख्या) ६ लाख ४१ हजार ४१८ ६ हजार १३९ १ लाख २९ हजार ५५०

मध्यरात्रीपासून किणी व तासवडे टोलनाक्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य केला आहे. ज्या वाहनांनी फास्टॅग काढला नसेल त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. त्याकरिता तीन लेन फास्टॅग, तर एक लेन हायब्रीड केली आहे.- चंद्रकांत बर्डे,नोडल अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूर