आकुर्डे येथील स्टोनक्रशर कार्यालयातून दीड लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST2021-04-13T04:24:16+5:302021-04-13T04:24:16+5:30
आकुर्डे (ता. पन्हाळा) येथील स्टोनक्रशर कार्यालयातून रोख रक्कम दीड लाख लंपास झाल्याची फिर्याद ओंकार ...

आकुर्डे येथील स्टोनक्रशर कार्यालयातून दीड लाख लंपास
आकुर्डे (ता. पन्हाळा) येथील स्टोनक्रशर कार्यालयातून रोख रक्कम दीड लाख लंपास झाल्याची फिर्याद ओंकार शिवाजी पाटील (वय ३१, रा. लोकप्रिय तरुण मंडळाजवळ, फुलेवाडी - कोल्हापूर) यांनी कळे पोलिसांत दिली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ओंकार पाटील यांचा आकुर्डे (ता. पन्हाळा) येथे करवीर इन्फ्रा या नावाने क्रशरचा व्यवसाय आहे. या ठिकाणच्या त्यांच्या कार्यालयातून बनावट चावीचा वापर करून चोरट्याने रोख १ लाख ५० हजार ८७० इतकी रक्कम लंपास केली.
अधिक तपास कळे पोलीस ठाण्याचे सहा. पो. निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलीस करत आहेत.