कसबा बावड्यात अडीच तोळे दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:45+5:302021-08-22T04:27:45+5:30
कोल्हापूर : कसबा बावड्यातील एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्याने अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लंपास केली. ...

कसबा बावड्यात अडीच तोळे दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लंपास
कोल्हापूर : कसबा बावड्यातील एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्याने अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लंपास केली. याबाबतची फिर्याद संजय जाधव (रा. कसबा बावडा, अभिदीप रेसीडेन्सी) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.
पोलिसांनी सांगितले, कसबा बावडा शिये रस्त्यावरील अभिदीप रेसिडेन्सीमध्ये संजय जाधव कुटुंबीयांसह राहतात. सहा दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे लाईन बाजार येथील घरी निधन झाले. त्यामुळे घराला कुलूप लावून जाधव कुटुंबीय लाईन बाजार येथील मूळ घरी गेले होते. या दरम्यान शुक्रवारी स्वत: संजय जाधव हे काही वस्तू आणण्यासाठी अभिदीप रेसिडेन्सी येथील घरी गेले. त्यावेळी त्यांना बंगल्याचे कुलूप कोणीतरी तोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने घरात प्रवेश केल्यानंतर घरातील दोन तिजोऱ्या व एक कपाट फोडले. त्यातील साहित्य विस्कटून अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व दीड लाखांची रोकड चोरून नेली. याबाबत पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला.