कांबळे कुटुंबीयांना दीड लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:24+5:302021-07-04T04:17:24+5:30
मनोहरची घरची परिस्थिती बेताची आहे. कोरोनाकाळात त्याला आजाराने घेरले. सीपीआर दवाखान्यात तब्बल सव्वा महिना उपचार चालू होते. अखेर त्याचा ...

कांबळे कुटुंबीयांना दीड लाखांची मदत
मनोहरची घरची परिस्थिती बेताची आहे. कोरोनाकाळात त्याला आजाराने घेरले. सीपीआर दवाखान्यात तब्बल सव्वा महिना उपचार चालू होते. अखेर त्याचा मृत्यू झाला. भावेश्वरी युवा मंचचा अध्यक्ष म्हणून तो काम पाहत होता. गावातील प्रत्येकाशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. गावातील पाण्यासाठी राबवलेल्या जलस्वराज्य प्रकल्पात त्याचे योगदान मोलाचे होते. तसेच गावच्या सामाजिक कामात नेहमी अग्रेसर होता. मनोहरला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याच्या जाण्याने मुलांच्या शिक्षणाची वाताहत होऊ नये यासाठी गावातील तरुण मंडळे, दानशूर व्यक्तींकडून मदत जमा करण्यात आली. यावेळी भावेश्वरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष संदेश भोईटे, सरपंच श्रीधर भोईटे, युवा स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष शहाजी वारके, भुदरगड प्रतिष्ठानचे सल्लागार योगेश भोईटे, किरण भोईटे, उपसरपंच अशोक गुरव, सदस्य गणेश मोरबाळे, भिकाजी मगदूम, पुंडलिक ढेकळे, उत्तम मुळीक, संजय गुरव, कपिल गुरव, एस. एल. कांबळे आदी उपस्थित होते.
०३ पांगिरे मदत
फोटो ओळ दिंडेवाडी येथील मनोहर कांबळे यांच्या कुटुंबीयांकडे मदत सुपूर्द करताना विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ.