शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘कडकनाथ’मधून आणखी दीड कोटीचा गंडा-: सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:00 IST

पैसे गुंतवल्यानंतर काही दिवस पक्षी, औषधे व साहित्य मिळाले. मात्र, नंतर ते मिळणे बंद झाले. शिवाय कंपनीने अंडी व पक्षी खरेदी बंद केली. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफलटणच्या कंपनीवर गुन्हा

सांगली : फलटण (जि. सातारा) येथील फूड बर्ड अ‍ॅग्रो प्रायव्हेट कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना एक कोटी ५४ लाख ६६ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या कंपनीच्या अध्यक्षांसह दहाजणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसाक अजमुद्दीन पठाण (वय ४१, अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणात ‘फूड बर्ड’चा अध्यक्ष मोहनराव भालचंद्र निंबाळकर, संचालक योगेश मोहनराव निंबाळकर, गणेश अरविंद निंबाळकर, सुनील अण्णा धायगुडे, राहुल दत्तात्रय ठोंबरे, सुखदेव रामचंद्र शेंडगे, सचिन तुकाराम करे, संजय भगवान भोरे, जॉन्सन क्रिस्तोफर रायचुरी, व्यवस्थापकीय संचालक शौकत मीरासाहेब करीम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी पठाण यांचे अहिल्यानगर चौकात मटण आणि चिकनचे दुकान आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांना फलटण येथील फूड बर्ड अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कडकनाथ कोंबडी पालनाबाबत माहिती मोबाईलवर मिळाली होती. गणेश निंबाळकर आणि राहुल ठोंबरे यांनी फलटण येथे बोलावून घेत त्यांना मार्गदर्शन केले होते.

गुंतवणूकदारांना फलटण येथे जाण्यास अडचण येते म्हणून सांगलीतील शंभरफुटी रस्ता परिसरात कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील १४० जणांनी पैसे गुंतवले होते. ती रक्कम एक कोटी ५४ लाख ६६ हजार रुपये होती. पैसे गुंतवल्यानंतर काही दिवस पक्षी, औषधे व साहित्य मिळाले. मात्र, नंतर ते मिळणे बंद झाले. शिवाय कंपनीने अंडी व पक्षी खरेदी बंद केली. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

गुंतवणुकीचे आमिषकंपनीच्या एका युनिटमध्ये ७५ हजारांची गुंतवणूक केल्यास २२० कडकनाथ कोंबड्यांचे पक्षी व दहा महिन्याचे कोंबडी खाद्य, औषध व भांडी कंपनीकडून देणार असल्याचे सांगितले होते. सभासदांकडून एक वर्षात कडकनाथ पक्ष्यांची एकूण ८५०० अंडी २ लाख ३८ हजार रुपयांना कंपनी खरेदी करणार असल्याचेही सांगितले होते. तर एक वर्षात दोन लाख ३८ हजारांचा फायदाही गुंतवणूकदारास होईल, असे आमिष दाखविण्यात आले होते.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी