शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2024: तिसऱ्या माळेला अंबाबाई सजली चंद्रलांबा परमेश्वरी रूपात

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 5, 2024 17:06 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, सलग सुट्यांमुळे शनिवारी भाविकांच्या गर्दीचा ओघ कायम राहिला. श्रीक्षेत्र सन्मती हे कर्नाटकातील गुलबर्गा येथे असून, ते भीमा नदीच्या काठावर वसले आहे. या देवीला हिंगुळांबा किंवा भ्रमरांबा देवीदेखील म्हणतात.श्री अंबाबाईच्या दुपारच्या आरतीनंतर देवीची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात पूजा बांधली गेली. श्रीराम लंका विजयानंतर अयोध्येत परतल्यावर विजयोत्सव साजरा केला गेला. पण त्यासाठी समुद्राला आमंत्रण न मिळाल्याने त्याने अयोध्येत येऊन श्री रामाची निर्भत्सना केली. त्यावेळी सीतामाईंनी त्याला य:कश्चित भ्रमरांकडून तुझा प्राण जाईल असा शाप दिला. पुढे शेष कन्येपासून सेतूराज जन्मला. त्याने पुढे आपल्याला शस्त्राने मरण येणार नाही असा वर मिळवला. त्यावर साधू, संत, ब्राह्मण ऋषी सती यांना त्रास दिल्यास वर नष्ट होईल, असे शंकरांनी सांगितले. पण तो उन्मत्त वागू लागला. एकदा अरण्यात फिरताना तो नारायण मुनींची पत्नी चंद्रवदनेला पाहून मोहित झाला. मुनींनी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; पण निष्फळ ठरला. नारायण मुनींनी हिमालयात जाऊन हिंगुळा देवीला प्रसन्न केले व तिला आपल्यासोबत विनंती केली. देवी त्यांच्यासोबत निघाली व मागे फिरून न पाहण्याची आज्ञा केली. पण मुनींना आवाज येईना म्हणून त्यांनी मागे फिरून पाहिले. देवीने त्यांना आता येथेच राहून मी कार्य करेन, असे सांगितले. पण एक घट मुनींना देत तो सेतुराजाच्या प्रांगणात फोडण्यास सांगितले. मुनींनी तसे केल्यावर त्यातून पाच भ्रमर निघाले. त्यापासून असंख्य भ्रमर निघाले. त्यांच्या दंशाने राजाचे सैन्य मारले गेले. सेतूराजाने अंगाचा दाह कमी करण्यासाठी भीमा नदीत उडी घेतली व त्याचा अंत झाला. नारायण मुनींनी देवीला प्रार्थना करून सन्मती या क्षेत्री आणले व तेथे तिची स्थापना केली. हीच ही चंद्रलांबा देवी. नंतर सगळे भ्रमर देवीच्या पायात गुप्त झाले. ही पूजा विद्याधर मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर यांनी बांधली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर