शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ढगांचा अडथळा, सुर्यकिरणे अंबाबाई देवीच्या पितळी उंबरठ्यापर्यंत

By सचिन भोसले | Updated: November 9, 2023 18:52 IST

कोल्हापूर : करवीर निवासीनी अंबाबाई दक्षिणायन किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी किरणे पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचून लुप्त झाली. किरणे देवीच्या मूर्तीपर्यंत ...

कोल्हापूर : करवीर निवासीनी अंबाबाई दक्षिणायन किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी किरणे पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचून लुप्त झाली. किरणे देवीच्या मूर्तीपर्यंत पोहचण्यात ढगांचा अडथळा प्रमुख कारण ठरले.दक्षिणायन किरणोत्सवास काल,बुधवारी(दि.८) पासून सुरुवात झाली आहे. हा किरणोत्सव सोमवारी (दि.१३) पर्यंत असणार आहे. पहिल्या दिवशी किरणे देवीच्या संगमरवरी पायऱ्यांपर्यंत पोहचून लुप्त झाली. तर दुसऱ्या दिवशी आज, गुरुवारी सकाळी काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. यात दुपारनंतर सुधारणा झाली किरणांची तीव्रता वाढली. त्यामुळे दुपारी पावणेपाच वाजता किरणे महाद्वारातून मंदीरात पोहचली. त्यानंतर हवेतील आर्द्रता अचानकपणे वाढली आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले. याचा एकत्रित परिणाम किरणे देवीच्या गाभारापर्यंत पोहचलीच नाही. ही किरणे केवळ पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचून लुप्त झाली. दुसऱ्या दिवशीही भक्तांचा हिरमोड झाला. आता पुढील चार दिवस हा किरणोत्सव असणार आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत पुर्ण क्षमतेने किरणे देवीच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचून हा उत्सव पुर्ण होईल अशी आशा जाणकारांकडून व्यक्त होत आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे व कर्मचारी आणि भक्त उपस्थित होते.

किरणांचा प्रवास असा

  • महाद्वार- ४.४५ वाजता मंदीरात प्रवेश
  • गरुड मंडपात- ५.०० वाजता पोहचली.
  • गरुड मंडप चौथारा- ५-०५ मिनिटांनी पोहचली.
  • गरुड मंडप जिना- ५.०७ मिनिटांनी पोहचली.
  • गणपती मंदिर चौक- ५ वाजून २१ मिनिटांनी पोहचली.
  • पितळी उंबऱठ्यापर्यंत ५ वाजून ३२ मििनटांनी पोहचली आणि तेथून पुढे ढगांचा अडथळा निर्माण झाला आणि किरणे लुप्त झाली.

किरणे देवीच्या मूर्तीवर पोहचण्यासाठी ५० ते ५५ लक्स इतकी आर्द्रता लागते. पण आज गुरुवारी ७१ लक्स इतकी म्हणजे २० टक्के जादा आर्द्रता हवेत होती. त्यात घनदाट ढग आल्याने दुसऱ्या दिवशी किरणे पितळी उंबरठ्यापर्यंतच पोहचली. - मिलिंद कारंजकर, किरणोत्सव अभ्यासक,

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर