लोकराजाला अभिवादन! कोल्हापूरकरांनो उद्या सकाळी १० वाजता आहे तिथेच स्तब्ध रहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 02:11 PM2023-05-05T14:11:53+5:302023-05-05T14:12:05+5:30

१०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करूया

On the occasion of the 101st memorial day of Rajrishi Chhatrapati Shahu Maharaj, Kolhapurkar will salute Lokraja Shahu Maharaj by standing still for 100 seconds at 10 am on Saturday morning | लोकराजाला अभिवादन! कोल्हापूरकरांनो उद्या सकाळी १० वाजता आहे तिथेच स्तब्ध रहा

लोकराजाला अभिवादन! कोल्हापूरकरांनो उद्या सकाळी १० वाजता आहे तिथेच स्तब्ध रहा

googlenewsNext

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी (दि.६) सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात आमूलाग्र क्रांती घडून आली. शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे विचार व कार्य सर्वांपर्यंत पोहोचवूया. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, तरुण मंडळे, बचत गटांच्या सदस्यांसह सर्व घटकांनी सहभागी व्हावे व इतरांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करुया, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. 

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया. या उपक्रमात सर्व अबालवृद्धांसह सहभागी होवूया आणि राजर्षी शाहू महाराजांचे विचार पुढे नेवूया, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: On the occasion of the 101st memorial day of Rajrishi Chhatrapati Shahu Maharaj, Kolhapurkar will salute Lokraja Shahu Maharaj by standing still for 100 seconds at 10 am on Saturday morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.