शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Navratri २०२५: पाऊसधारांच्या साक्षीने झाली अंबाबाई-त्र्यंबोलीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:36 IST

कोहळा भेदन, अंबा माता की जयचा गजर, शाही लवाजमा, पारंपरिक वाद्यांचा गजर अशा मंगलमयी वातावरणात पार पडली त्र्यंबोली यात्रा 

कोल्हापूर : धो-धो कोसळणाऱ्या पाऊसधारांच्या साक्षीने शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई व सखी त्र्यंबोली देवीची हृदयभेट घडली. तोफेची सलामी, आरती, छत्रपतींच्या हस्ते कुमारिका पूजन, तिच्या हस्ते कोहळा भेदन, अंबा माता की जयचा गजर, तुळजाभवानी, गुरुमहाराजांच्या पालख्या, शाही लवाजमा, पारंपरिक वाद्यांचा गजर अशा मंगलमयी वातावरणात त्र्यंबोली यात्रा पार पडली. भर पावसाच्या सरी झेलत भाविकांनी टेकडीवर उपस्थिती लावली.शारदीय नवरात्रौत्सवात पंचमीला अंबाबाईची पालखी आपल्या शाही लवाजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. याचवेळी जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवी व छत्रपती शिवाजी महाराजांची, तसेच गुरू महाराजांची पालखी देखील रवाना होते. छत्रपतींच्या हस्ते पुजारी गुरव घराण्यातील कुमारिकेचे पूजन होते. तिच्या हस्ते राक्षसरुपी कोहळा भेदनाचा विधी होतो.शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. पाऊसधारा झेलत सकाळी १० वाजता अंबाबाईची पालखी मंदिरातून बाहेर पडली. भवानी मंडप, बिंदू चौक, उमा टॉकीज चौक मार्गे बागल चौकात आली. शाहू मिल परिसरात व राजारामपुरी मार्गे टाकाळा खण येथे विसावा घेण्यात आला. दोन्हीकडे धार्मिक विधी पडले. दुपारी पावणे एक वाजता अंबाबाईची पालखी त्र्यंबोली टेकडीवर आली.

वाचा : पंचमीनिमित्त कोल्हापुरातील अंबाबाईची अंबारीतील पूजात्र्यंबोली मंदिरात अंबाबाई व त्र्यंबोली देवीची भेट झाली, समोरील सभा मंडपात माजी खासदार संभाजीराजे, शहाजीराजे व यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते स्वरा गुरव या कुमारिकेचे पूजन झाले. देवीची आरती झाली. त्यानंतर कुमारिकेच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा भेदनाचा विधी झाला. याविधीनंतर कोहळा घेण्यासाठी भाविकांची झटापट झाली. त्यानंतर मात्र वातावरण शांत झाले तुळजाभवानी व गुरुमहाराजांच्या पालख्या मार्गस्थ झाल्या. अंबाबाईची पालखी मात्र उशीरा निघाली. वाटेत भाविकांना भेट देत सायंकाळी पालखी मंदिरात परतली.

पावसामुळे तारांबळ.. गर्दी रोडावलीत्र्यंबोली यात्रेला दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी असते. कोहळा घेण्यासाठी मारामारी, पोलिसांचा लाठीमार असे प्रकार घडतात. यंदा मात्र पावसामुळे गर्दी कमी होती. त्यातही भाविक छत्री घेऊन उभे होते. दुपारी एक वाजता पावसाने जास्त जोर धरला. त्या पाऊसधारा झेलत भाविक अंबाबाईचा गजर करत होते.

रांगोळीऐवजी फुलांच्या पायघड्यादरवर्षी अंबाबाईच्या पालखी मार्गावर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात यंदा पावसामुळे फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. वाटेवर ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले जात होते. प्रसाद व सरबत वाटप सुरू होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambabai-Tryamboli Meet Witnessed by Rain in Navratri 2025

Web Summary : Amidst heavy rain, Ambabai and Tryamboli met. Festivities included a cannon salute, Kumari Pujan, and the breaking of the gourd. Despite the rain, devotees gathered, celebrating with traditional fervor and floral decorations.