शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

देशाला अनोखी मानवंदना, कोल्हापूरचे ६४ वर्षीय वृध्द नऊ तास नऊ मिनिटे ७५ किलोमीटर धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 14:16 IST

सेवानिवृत्त झालेले महिपती संकपाळ यांना धावण्याचा छंद

कोल्हापूर : धावायला तुम्ही तरुणच असायला पाहिजे असं काही नाही. तुमची इच्छा असेल, संकल्प असेल आणि विशेष म्हणजे तुमचे मन तरुण असेल तर धावणं शक्य आहे. याचीच प्रचिती सोमवारी ६४ वर्षीय महिपती शंकर संकपाळ यांच्या उपक्रमातून आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संकपाळ यांनी ७५ किलोमीटरचे अंतर नऊ तास नऊ मिनिटात धावत पूर्ण केले.हे ७५ किलोमीटरचे अंतर सलग धावण्याचा विक्रम कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महिपती शंकर संकपाळ यांनी पूर्ण केला. या उपक्रमासाठी संकपाळ यांनी सोमवारी शहरातील रंकाळा तलावास तब्बल नऊ तास नऊ मिनिटे, २९ सेकंदात १७ प्रदक्षिणा घातल्या. वयाच्या ६४व्या वर्षी त्यांनी हा विक्रम करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमाराला सुरू करण्यात आलेला हा उपक्रम सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराला पूर्ण करण्यात आला.हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना कोल्हापूर मास्टर अथलेटिक्स असोसिएशन व कोल्हापूर वॉकर्स असोसिएशनचे बाळासाहेब भोगम, रघुनाथ लाड, धोंडीराम चोपडे, परशुराम नांदवडेकर, नाना गवळी, अजित मोरे, उदय महाजन, उदय गायकवाड, राजेश पाटील, अविनाश बोकील इत्यादींनी प्रत्येकी २-३ प्रदक्षिणा त्यांच्यासोबत घालून त्यांना हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.संकपाळ यांना धावण्याचा छंद

  • एमएसईबी वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झालेले महिपती संकपाळ यांना धावण्याचा छंद आहे. मूळचे वाळवा, ता. राधानगरी येथील संकपाळ पाचगाव रोडवर रहायला आहेत. वयाच्या ४५ वर्षांपासून त्यांनी हळूहळू धावण्यास सुरवात केली. ज्येष्ठांच्या अनेक मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी हिरिरीने भाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत.
  • ज्येष्ठांच्या एशियन चॅम्पियनशीप मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन पहिल्या पाचमध्ये येण्याचा बहुमान पटकावला आहे. पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अमृतमहोत्सवी दौडमध्ये त्यांनी भाग घेऊन त्याच दिवशी ७५ किलोमीटर धाव पूर्ण करण्याचा संकल्प केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन