शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ते नंदवाळ उद्या वारी, फलकांद्वारे निवडणुकीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:16 IST

पालखी मार्गावर ओंगळवाणे प्रदर्शन

कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर ते नंदवाळ असा रविवारी दिंडी सोहळा होत असून, वारकऱ्यांचे स्वागत करण्याकरिता या मार्गावर पावलोपावली मोठ्या संख्येने डिजिटल फलक उभारले आहेत. जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेसमोर जाण्याची डिजिटल फलकांच्या माध्यमातून ही संधी साधली आहे. परंतु त्यामुळे पालखी मार्गावर अत्यंत ओंगळवाणे प्रदर्शन झाले आहे. ज्यांनी कधीच पंढरीच्या पांडुरंगाला पाहिले नाही, वारी दोन पाउले चालले नाहीत असे लोकही गळ्यात वीणा घालून डिजिटलवर झळकले आहेत.कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिरापासून सुरू होणारा हा दिंडी सोहळा प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे विसर्जित होतो. लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होऊन चालत वारी पूर्ण करत आहेत. यावर्षी उद्या, रविवारी आषाढी एकादशी असून याच दिवशी सकाळी ८ वाजता हा दिंडी सोहळा सुरू होणार आहे. या दिंडीत चांदीचा रथ हे मुख्य आकर्षण राहणार आहे.नंदवाळ वारीला यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची झालर लागली आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणूक प्रभाग तयार करण्याचे काम सुरू आहे. तर इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांच्या संपर्कात आघाडीवर आहेत. त्यांनी या वारीचे निमित्त साधून दिंडी जाणाऱ्या मार्गावर पावलोपावली डिजिटल फलक उभारले आहेत. कोल्हापूर ते नंदवाळ या दहा ते बारा किलोमीटर अंतरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा मिळेल तेथे डिजिटल फलक उभारले आहेत. क्रशर चौक ते पुईखडीपर्यंत रस्त्याच्या डिव्हायडरवरही फलकबाजी केली आहे.काही इच्छुकांनी सामाजिक संस्था, तरुण मंडळांच्या सहकार्याने स्वागत मंडपदेखील उभारले आहेत. या स्वागत मंडपांमध्ये अल्पोपाहार, फळे, चहा, दूध असे उपवासाचे पदार्थ वाटपाचेही नियोजन केले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने दिंडी जाणाऱ्या मार्गावरील खराब रस्त्यांवर मुरुमाचे पॅचवर्क केले असून, सर्व रस्ते स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे.