शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अक्षय्यतृतियेला अंबाबाईची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा, मूळ मूर्तीला आंब्याची रास-video

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 10, 2024 19:13 IST

देवीचे हे रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतियेला करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा वसंतोत्सव साजरा करता शुक्रवारी देवीची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा बांधण्यात आली. यादिवशी आंब्याला विशेष मान असल्याने मूळ मूर्तीची आंब्याच्या राशीतील सालंकृत पूजा झाली. वैशाख वणव्यात झोपाळ्यावर बसून झुला घेत असलेल्या देवीचे हे रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.मेमधील वैशाख वणवा असला तरी हा वसंतोत्सव असतो. याकाळात प्रत्येक देवाचा दोलोत्सव म्हणजे हिंदोळ्यावरील पूजा बांधण्याची पद्धत आहे. त्यानुसार परंपरेने अक्षय्यतृतियेला अंबाबाईच्या उत्सवमूर्तीची गरूड मंडपात हिंदोळ्यावरील मनोहारी पूजा बांधली जाते. दुपारी चार वाजता देवीची उत्सवमूर्ती गाभाऱ्यातून गरूड मंडपात आणण्यात आली.चांदीच्या सिंहासनावर अंबाबाईची मूर्ती विराजमान झाल्यानंतर झोपाळ्यासारखा तख्तपोशीला बांधण्यात आले. त्याला फुलापानांनी सजवल्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधली की अंबाबाईला हळद कूंकू वाहून कैरीची डाळ आणि पन्हं यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. देवीच्या एका बाजूला हवालदार आणि दुसऱ्या बाजूला सोन्याचा दंड घेऊन देवीला हाताने झोका देत होते. वैशाख वणव्यात शांतपणे असा झुला घेत बसलेल्या अंबाबाईचे अलौकिक रुप पाहणे म्हणजे एक साेहळाच असतो.शुक्रवार असल्याने रात्री देवीची पालखी झाल्यानंतर हा सोहळा पूर्ण झाला. दुसरीकडे देवीच्या मूळ मूर्तीची आंब्याच्या राशीतील पूजा बांधण्यात आली.

गणपती चौकातून दर्शनसध्या गरूड मंडप नाजूक अवस्थेत असल्याने तेथे कोणालाही सोडले जात नाही. तेथे फक्त अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे नित्य व नैमित्तीक धार्मिक विधी केले जातात. भाविकांना देवीची झुल्यातील पूजा पाहता यावी, दर्शन घेता यावे यासाठी गणपती मंदिराच्या मागील बाजूने भाविकांची स्वतंत्र रांग करण्यात आली होती.

मूळ मूर्तीची आंब्याच्या राशीतील सालंकृत पूजा video

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीया