शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

Kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची कमलालक्ष्मी रूपात पूजा, तोफेच्या सलामीने घटस्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:51 IST

यंदा नवरात्रौत्सवात अंबाबाईची दशमहाविद्या रूपातील पूजा बांधण्यात येणार

कोल्हापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील देवता करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आज, सोमवारपासून मंगलमयी वातावरणात प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना झाली. पहिल्या दिवशी घट बसत असल्याने देवीची बैठी रूपात पूजा बांधली गेली. यंदा नवरात्रौत्सवात अंबाबाईची दशमहाविद्या रूपातील पूजा बांधण्यात येणार असून, सोमवारी देवीची कमळात बसलेल्या लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली.देशातील ५१ व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातील लाखो भाविक या काळात कोल्हापूरला भेट देतात. सोमवारी पहाटे काकड आरती, पहिला अभिषेक झाल्यानंतर साडेआठ वाजता मुनिश्वर घराण्यातील श्रीपूजकांच्या हस्ते घटस्थापना झाली. तोफेच्या सलामीने देवीचे घट बसले आणि अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची कमळात बसलेल्या लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली.या देवीची सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असून, ही देवी दिव्य अलंकाराने तेजस्वी व सुंदर दिसते. देवीच्या दोन्ही हातात कमळ असून, खालचे दोन्ही हात वरदायक व अभय देत आहेत. ही देवी कमळात बसली असून, हत्तींचीही उपस्थिती आहे. ही दशमहाविद्यातील दहावी देवता आहे. देव व असुरांनी समुद्र मंथन केले, तेव्हा श्री कमलालक्ष्मी ही पहिली देवतारत्न मार्गशीर्ष अमावस्येला प्रकट झाली. त्यानंतर अन्य तेरा रत्ने प्रकट झाली. या देवीला कमला, लक्ष्मी, दशमी, गजलक्ष्मी, गजेंद्रलक्ष्मी नावाने ओळखले जाते. हिच्या उपासनेने दारिद्र्य, दु:ख शोक, दुर्भाग्य नष्ट होऊन सुख-सौभाग्य, यश व उन्नती लाभते अशी श्रद्धा आहे.