कोल्हापूर : जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला जगातल्या महत्त्वाच्या बिल्डिंग हिरव्या प्रकाशात झळकल्या. त्यांची यादी ऑफिशियल अर्थ डे यांनी लिंक इन वर फोटोसहीत पोस्ट केली असून यात शिवाजी विद्यापीठाच्या इमारतीचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे अर्थ डे वर जगातील नऊच इमारती झळकल्या असून यात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व शिवाजी विद्यापीठाची इमारत या दोनच इमारतीचा समावेश आहे. विद्यापीठाच्या इमारतीला जगातील महत्त्वाच्या बिल्डिंगच्या यादीत स्थान मिळाल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शांघाय येथील मार्सिडेज बेन्झ अरीना, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज ट र्मिनस, पोर्तुगल येथील स्यांचुरी ऑफ ख्रिस्त द किंग, न्यूयॉर्क येथील वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, दिल्ली येथील सेंट जेम्स चर्च, पोलंड येथील वॉर्सा, कराची येथील फ्रेअरे हॉल, स्कॉटलंड येथील ओ वो हायड्रो अरीना व कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ इमारत अशा जगातील ९ इमारती अर्थ डे वर झळकल्या आहेत.