शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जुने प्रतिस्पर्धी की नवा पर्याय!

By admin | Updated: October 20, 2015 00:19 IST

मतदारांचा कौल कुणाला : सावंत, टिपुगडे, मोहिते यांच्यात चुरस

कोल्हापूर : संभाजीनगर बसस्थानक प्रभागात शिवसेनेचे दत्ताजी टिपुगडे, राष्ट्रवादीचे महेश सावंत आणि भाजपच्या यशोदा मोहिते यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे. सावंत, टिपुगडे हे जुनेच प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, यावेळी प्रथमच प्रभागाबाहेरील मोहिते यांनी दोघांपुढे आव्हान निर्माण केले आहे. मतदार जुन्या प्रतिस्पर्ध्यांपैकी कोणाला पुन्हा संधी देणार की मोहिते यांचा पर्याय स्वीकारणार हे पाहावे लागेल. उच्चशिक्षित, नोकरदार, श्रमिक, कष्टकरी अशी संमिश्र लोकवस्ती असलेल्या प्रभागात शेवटच्या टप्प्यात जो उमेदवार हात सैल सोडेल, त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. मुळात गेल्या काही वर्षांपासून महेश सावंत व दत्ताजी टिपुगडे या प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरत आले आहेत. ‘मी नाही तर माझी पत्नी’ असा त्यांचा अट्टाहास कायम राहिला आहे. गेल्या निवडणुकीत ‘सर्वसाधारण महिला’ असे आरक्षण पडले, त्यावेळी टिपुगडे व सावंत यांनी त्यांच्या पत्नींना निवडणूक लढविण्यास भाग पाडले. आता सर्वसाधारण आरक्षण असल्याने दोघांनी पुन्हा विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. महेश सावंत यांच्या पत्नीचा पराभव झाल्यानंतर ते कधीही या प्रभागात फिरकले नाहीत. मतदारांशीच नाही तर कार्यकर्त्यांशीही संपर्क ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलही नाराजी दिसते. काँग्रेसकडे मालोजीराजे समर्थक समीर घोरपडे यांनी उमेदवारी मागितली होती; पण त्यांना न देता अमर नंदकुमार जरग या नवख्या उमेदवारास पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपच्या यशोदा मोहिते या प्रभागातील रहिवासी नाहीत; परंतु प्रभागात त्यांचा व त्यांचे पती प्रकाश मोहिते यांचा संपर्क आहे; परंतु जिंकून येण्याएवढा हा जनसंपर्क नक्कीच उपयोगी पडणार नाही. त्यांच्यामागे राज्यातील सत्ताधारी पक्षाची ताकद उभी राहणार आहे. याशिवाय अमर जरग (कॉँग्रेस), प्रताप पाटील (अपक्ष), प्रशांत पिसे (अपक्ष) व अजित सूर्यवंशी हेही रिंगणात आहेत. ( प्रतिनिधी )मतभेद : फटका कोणाला...शिवसेनेतील मतभेदाचा फटका दत्ताजी टिपुगडेंना बसतो का हे पाहावे लागणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील राजकीय वाद संपल्याचे सांगितले जाते; पण मतदानयंत्रे खोलल्यावरच त्याची खात्री पटणार आहे. दुसरे म्हणजे टिपुगडे यांनी कामे करण्याचा प्रयत्न केला असला तरी ती सगळीच पूर्ण झालेली नाहीत. जुना वाशी नाका, राजाराम चौक ते टिंबर मार्केट कमान हा रस्ता गेल्या चार वर्षांपासून रखडला आहे. काही भागांत पाण्याचा प्रश्नही मिटला नाही. त्याबद्दल काहीशी नाराजी आहे.