यड्रावमध्ये वृद्धांचा झाडू मोचा
By Admin | Updated: November 25, 2014 00:00 IST2014-11-24T23:50:04+5:302014-11-25T00:00:55+5:30
मागण्या शासनस्तरावर पोहोचविण्याचे आश्वासनर्

यड्रावमध्ये वृद्धांचा झाडू मोचा
यड्राव : राष्ट्रीय वृद्ध सेवाश्रम संघाच्यावतीने प्रत्येक वृद्धाला तीन हजार पेन्शन मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी तलाठी कार्यालयावर झाडू मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन तलाठी ए. एस. कुंभार यांनी स्वीकारले व सर्व मागण्या शासन स्तरावर पोहोचवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.येथील निराधार वृद्ध महिला, विधवा महिला, भूमिहीन शेतमजुरांच्या न्याय्य हक्कासाठी व स्वच्छ भारत अभियानाचे औचित्य साधत स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यासाठी झाडू मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीपासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चामध्ये सहभागी महिलांनी हातात झाडू घेतला होता. ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’च्या घोषणा महिलांनी दिल्या.तलाठी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी संघाचे सचिव संतोष कांबळे यांनी वृद्धांना तीन हजार रुपये पेन्शन, वृद्ध निराधार, विधवा, अपंग यांच्या मासिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करावी, यांसह विविध मागण्यांचे निवेदन वाचून दाखविले. हे निवेदन तलाठी ए. एस. कुंभार यांना दिले. याप्रसंगी सरपंच सरदार सुतार उपस्थित होते. सदरच्या मागण्या शासन स्तरापर्यंत पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन कुंभार यांनी दिले.मोर्चामध्ये श्रीमती सुरेखा काटकर, इस्माईल ऐनापुरे,
चंदाताई पाटील, राधाताई
कांबळे, संतोष कांबळे, आप्पासाहेब आदमाने, तम्मान्ना बेल्याळ,
बाजीराव आदमाने यांच्यासह सुमारे साठ महिलांचा सहभाग होता. (वार्ताहर)