जुना राजवाडा, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यांची स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST2021-04-27T04:23:59+5:302021-04-27T04:23:59+5:30
तत्कालीन पोलीस महासंचालकांनी २०१६ मध्ये मुंबईमध्ये पोलीस महानिरीक्षकांची बैठक घेतली होेती, त्या बैठकीत पोलीस दलाचे कामकाज सुधारावे, प्रलंबित गुन्हे ...

जुना राजवाडा, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यांची स्पर्धेसाठी निवड
तत्कालीन पोलीस महासंचालकांनी २०१६ मध्ये मुंबईमध्ये पोलीस महानिरीक्षकांची बैठक घेतली होेती, त्या बैठकीत पोलीस दलाचे कामकाज सुधारावे, प्रलंबित गुन्हे त्वरित निकाली काढावेत, संशयितांवर गुन्हे शाबीत व्हावेत, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास व्हावा, कायदा व सुव्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने देशपातळीवर पोलीस ठाण्यांमध्ये स्पर्धा जाहीर केली होती.
या स्पर्धेच्या सर्वेक्षणासाठी विशेष समितीची स्थापना केली. समितीने राज्यातील पोलीस ठाण्यांचा सर्व्हे केला. स्पर्धेसाठी विविध निकष लावले. या निकषांच्या आधारावरच देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जुना राजवाडा पोलीस ठाणे व शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे या दोन पोलीस ठाण्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेचा निकाल देशपातळीवरून येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्या निकालाकडे पोलीस खात्याचे लक्ष लागून राहिले आहे.