शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘म्हातारीचा पठार’ पर्यटकांना खुणावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:52 IST

नामदेव पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क पांगिरे : मन प्रफुल्लित करणारे आल्हाददायक वातावरण, झुळझुळ वाहणारे वारे, रंगबेरंगी हंगामी रानफुले, ...

नामदेव पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपांगिरे : मन प्रफुल्लित करणारे आल्हाददायक वातावरण, झुळझुळ वाहणारे वारे, रंगबेरंगी हंगामी रानफुले, संथ तलाव, जांभा खडकात विस्तृत पसरलेला म्हातारीचे पठार(कामट) पर्यटकांना आकर्षित करत असून पठारावर पर्यटकांची संख्या वाढत आहे.भुदरगड तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली असून तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. गारगोटीपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर असलेल्या इतिहासाचा साक्षीदार असणारा भुदरगड किल्ल्याला जोडून दक्षिणेस अथांग पसरलेला विस्तीर्ण असा उंच कडा आहे, त्याचे एक टोक आजरा तालुक्यातील हद्दीपर्यंत आहे. चारीबाजूस गर्द वनराई पसरलेली आहे. या परिसरात अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले असून हिंदी चित्रपटांनादेखील लाजवेल अशी लोकेशन आहेत. कड्यावरून फिरताना पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला येतो. पावसाळ्यात जोरदार पाऊस व धुके मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आंबोलीच्या थरार येथे अनुभवता येतो.निसर्गाच्या कुशीत असणारे म्हातारीचे पठार (कामट) या नावाने देखील ओळखले जाते. पठारावरून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी बांध घालण्यात आला असून पाणी झुलपेवाडी धरणात वळवण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी पवनचक्कीचे काम सुरू होते. स्थानिक लोकांनी विरोध दर्शविल्यामुळे सध्या काम बंद आहे पवनचक्की उभा करण्यासाठी कच्चे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. वाहने थेट पठारावर घेऊन जाता येतात. त्यामुळे वाहनात बसून देखील पर्यटनाचा आनंद घेता येतो. अनेक शाळांनी या पठाराला भेटी दिल्या आहेत.या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास भुदरगड तालुक्याच्या सौंदर्यात आणखीन भर पडेल. यासाठी पठारावर जाणारा पक्का रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, सनसेट पॉर्इंट विकास करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासनाने व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.काय पाहालभुदरगड किल्ला, मंदिर, तलाव, इतिहासकालीन विहिरी, भारतीयसारख्या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झालेली जकीनपेठ, पेठ शिवापूर खेडी, लंबोत्री दगड, दगडात कोरलेली गुहा