जुने पारगावच्या सलून व्यावसायिकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:26+5:302020-12-06T04:27:26+5:30
नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले ) येथे वन विभागाच्या माळरानावर संजय शांतिनाथ कोरे (वय ५५, रा.जुने पारगाव, ...

जुने पारगावच्या सलून व्यावसायिकाची आत्महत्या
नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले ) येथे वन विभागाच्या माळरानावर संजय शांतिनाथ कोरे (वय ५५, रा.जुने पारगाव, ता. हातकणंगले) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे रात्री निष्पन्न झाले. घटनेची नोंद वडगाव पोलीसात झाली आहे.
पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : संजय कोरे यांचा मृतदेह वन विभागाच्या माळरानावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; पण ओळख न पटल्याने मृतदेह कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, वडगावचे पोलीस हवालदार रामराव पाटील व कृष्णात पाटील यांनी सोशल मीडियावर परिसरात मृतदेहाचे वर्णन पाठवले. त्यानंतर संजय यांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात दाखल झाले. संजय यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे शवविच्छेदनप्रसंगी स्पष्ट झाले. मात्र व्हिसेरा राखून ठेवला आहे. सीपीआर रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा संजय यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
संजय यांचे पारगाव येथील पाराशरनगर येथे सलूनचे दुकान होते. त्यांना पायाच्या दुखण्याचा त्रास होता. त्या दुखण्याने ते त्रासून गेले होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता त्यांच्या नातेवाइकांनी वर्तवली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.
फोटो नाही