आसुर्लेत डंपरखाली सापडून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:21 IST2020-12-23T04:21:42+5:302020-12-23T04:21:42+5:30

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुंगा अतिग्रे आणि त्यांची बहीण मंगळवारी दुपारी केर्ली (ता. करवीर) येथून मामीचे उत्तरकार्य आटपून कोतोली-नांदगाव ...

An old man was found dead under a dumper in Asurle | आसुर्लेत डंपरखाली सापडून वृद्धाचा मृत्यू

आसुर्लेत डंपरखाली सापडून वृद्धाचा मृत्यू

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुंगा अतिग्रे आणि त्यांची बहीण मंगळवारी दुपारी केर्ली (ता. करवीर) येथून मामीचे उत्तरकार्य आटपून कोतोली-नांदगाव रोडवरून दुचाकीवरून खोतवाडीकडे येत होते. दरम्यान, आसुर्ले येथील सागर पवार यांच्या शेतात मळी ओतून डंपर दालमिया कारखान्याकडे मळी भरण्यासाठी जात होता.

आसुर्ले येथील मराठी शाळेजवळील ओढ्याच्या पुलावरून उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला डंपर ओव्हरटेक करीत असताना या दोन्ही वाहनांना दुचाकीस्वार गुंगा अतिग्रे ओव्हरटेक करताना पुलाच्या कठड्याला दुचाकी घासली. त्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन गुंगा अतिग्रे आणि मोटारसायकल डंपरच्या पुढच्या चाकाखाली सापडली. त्यांच्या छातीवरून आणि डोक्याच्या उजव्या बाजूवरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या बहिणीने विरोधी बाजूला उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. भावाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून बहिणीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांना पोर्लेतील रुग्णवाहिकेतून सीपीआरला नेण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: An old man was found dead under a dumper in Asurle