वाठारजवळ अपघातात वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:02+5:302021-01-16T04:27:02+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: दीपक शिंदे व त्यांचे सासरे बाबूराव पाटील, लहान मुलगी असे तिघेजण कोल्हापूरला अंबाबाई दर्शनासाठी दुचाकीने ...

An old man died in an accident near Wathar | वाठारजवळ अपघातात वृद्धाचा मृत्यू

वाठारजवळ अपघातात वृद्धाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: दीपक शिंदे व त्यांचे सासरे बाबूराव पाटील, लहान मुलगी असे तिघेजण कोल्हापूरला अंबाबाई दर्शनासाठी दुचाकीने जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ आले असता पाठी मागून येणारीने ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कारने ( एमएच १०, सीएम ४०००) कोल्हापूरकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये अपघातात दुचाकीवरील तिघे फरपटत गेले. यामध्ये बाबूराव रघुनाथ पाटील यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तर नात, जावई दीपक शिंदे जखमी झाले. या तिघांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.१२) पाटील यांचा मृत्यू झाला .लहान मुलगी व तिचे वडिलाही उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार बाबासाहेब दुकाने करीत आहेत.

Web Title: An old man died in an accident near Wathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.