डंपरच्या धडकेत भुयेवाडीतील वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:26 IST2021-04-07T04:26:34+5:302021-04-07T04:26:34+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे भरधाव डंपरने ठोकरल्याने भुयेवाडी येथील पादचारी वृद्ध ठार झाले. विष्णू भैरू पाटील ...

An old man from Bhuyewadi was killed in a dumper collision | डंपरच्या धडकेत भुयेवाडीतील वृद्ध ठार

डंपरच्या धडकेत भुयेवाडीतील वृद्ध ठार

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे भरधाव डंपरने ठोकरल्याने भुयेवाडी येथील पादचारी वृद्ध ठार झाले. विष्णू भैरू पाटील (६० रा. भुयेवाडी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुयेवाडी येथील शेतकरी विष्णू पाटील हे पायी निगवे गावाकडे येत होते. त्यावेळी रस्त्यावरून क्रशरची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने आंबा बसस्टॉपनजीक पाटील यांना पाठीमागून ठोकरले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत त्यांचे पुतणे आनंदा पाटील यांनी तातडीने खासगी वाहनातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत पाटील हे शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. अपघातातील डंपरचालकास करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: An old man from Bhuyewadi was killed in a dumper collision