शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

क्षीरसागरना आक्रमकपणा, गद्दारी नडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 11:30 IST

पाच वर्षे भगवा खांद्यावर घ्यायचा आणि निवडणूक आली की सगळंच डोक्याला गुंडाळायचं, ही प्रवृत्ती सेनेत बळावत आहे. अशानेच ‘कोल्हापूर उत्तर’सह अन्य चार ठिकाणी शिवसेनेचे नाव पुसले गेले.

ठळक मुद्देशिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात दोन महिन्यांपूर्वी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता.

भारत चव्हाण कोल्हापूर : कधी-कधी आक्रमकपणा लोकांना आवडत नाही. राजेश क्षीरसागर यांनी जनतेच्या हिताकरिता आक्रमकपणा स्वीकारला; परंतु मूठभर लोकांनी त्याचे भांडवल करीत त्यांच्यावर आरोप केले. क्षीरसागर यांची प्रतिमा अशा आरोपांतून मतदारांपर्यंत पोहोचविण्यात विरोधक यशस्वी झाले. दुसऱ्या बाजूने शिवसेनेतील गद्दारीही त्यांना नडली. पाच वर्षे भगवा खांद्यावर घ्यायचा आणि निवडणूक आली की सगळंच डोक्याला गुंडाळायचं, ही प्रवृत्ती सेनेत बळावत आहे. अशानेच ‘कोल्हापूर उत्तर’सह अन्य चार ठिकाणी शिवसेनेचे नाव पुसले गेले.

शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात दोन महिन्यांपूर्वी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता. कोणी निवडणूक लढवावी, याचे विचारमंथन कॉँग्रेसमध्ये सुरू होते. कोणीच पुढे येईनात. मधुरिमाराजे छत्रपती यांचीही कॉँग्रेस नेत्यांनी मनधरणी केली; परंतु त्यांनीही नकार दिला. त्यामुळे क्षीरसागर हॅट्ट्रिक करतील, याची शक्यता जास्त वाटत होती. कॉँग्रेसकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांच्यापैकी एकही निवडून येण्याची शक्यता नव्हती; म्हणून भाजपमध्ये असलेल्या चंद्रकांत जाधव यांना पक्षात घेऊन कॉँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांच्याकडे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असल्याने आमदार सतेज पाटील यांनी त्यांना मोठे पाठबळ दिले.

  • दहा वर्षे आमदार म्हणून केलेले काम, विविध आंदोलनांतील आक्रमक सहभाग घेतलेल्या क्षीरसागर यांच्यासमोर जाधव यांचा टिकाव लागेल का, याची धास्ती कॉँग्रेसच्या गोटात होतीच; पण एकदा तिकीट मिळाले म्हटल्यावर उमेदवारी मागणाऱ्यांसह सर्वच नेते, कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने प्रचारात भाग घेतला. जिरवाजिरवीच्या भानगडीत कोणी पडले नाही. एकीकडे कॉँग्रेसमध्ये सकारात्मक विचार आणि जिंकण्याची तयारी सुरू असताना शिवसेनेत मात्र भलतेच घडत होते.
  •  
  • या निवडणुकीत आमदार क्षीरसागर एकीकडे आणि बाकी सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक भलतीकडेच जात होते. मागच्या दोन निवडणुकांत हाच अनुभव क्षीरसागर यांनी घेतला होता. त्यामुळे यावेळी तरी हा दुरावा संपविण्याचा कोणी प्रयत्न करील असे वाटले होते; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. क्षीरसागर यांनीही सर्व पदाधिकाºयांना दुर्लक्षित केले. त्यामुळे ते विरोधकांच्या छावणीत पोहोचले होते. एवढेच नाही तर त्यांनी उघडपणे कॉँग्रेसचा प्रचार करण्यास सुरुवात केली. अखेर ही गद्दारीच त्यांना नडली.
  •  
  • विरोधक खंडणीबहाद्दर, जुलमी राजकारण, भ्रष्टाचाराचे आरोप करीत असताना त्याचे खंडन करण्यात क्षीरसागर कमी पडले. उलट सर्वसामान्य जनतेवर कोणी अन्याय करीत असेल तर मी सुशिक्षित गुंड व्हायला तयार आहे, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या आक्रमकपणाचे समर्थन केले. हा आक्रमकपणा त्यांना पराभूत करण्यास कारणीभूत ठरला. शिवाजी पेठेतील इंगवले बंधूंमधील वादाचाही त्यांना फटका बसला. जाधव यांनी शेवटच्या क्षणी कॉँग्रेसच्या मैदानावर येऊन विजयी गोल केला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक