अधिकाºयांना फिरविले चिखलातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:29 AM2017-09-15T00:29:55+5:302017-09-15T00:31:24+5:30

सांगली : गेल्या दोन दिवसात सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शामरावनगर परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील दहा ते पंधरा घरात पावसाचे पाणी शिरले असून, गटारी तुंडुंब भरल्या आहेत.

 Officials from Revolving Mud | अधिकाºयांना फिरविले चिखलातून

अधिकाºयांना फिरविले चिखलातून

googlenewsNext
ठळक मुद्दे नगरसेवकांसह नागरिकांचा ठिय्या : शामरावनगरातील घरांमध्ये पाणी शिरलेबहुतांश घरांना पाण्याने वेढा दिला आहे. मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचून आहे. पवार यांना दलदलीत फिरवून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या दोन दिवसात सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शामरावनगर परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील दहा ते पंधरा घरात पावसाचे पाणी शिरले असून, गटारी तुंडुंब भरल्या आहेत.
याविरोधात गुरुवारी संतप्त नागरिकांनी नगरसेवकांसह चिखलात ठिय्या मारला. महापालिकेच्या अधिकाºयांनीही तातडीने या परिसराला भेट देऊन पाहणी केली. तब्बल तीन ते चार किलोमीटर अंतर अधिकाºयांना चिखलातून फिरविले. महापालिकेच्या निषेधाच्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.

शामरावनगर परिसरातील ज्ञानेश्वर कॉलनी, मॉडर्न कॉलनी, झहीर मस्जीद परिसर, फिरदोस मोहल्ला, जनता बँक कॉलनी, महादेव मंदिर परिसर, सोनार सोसायटी, महसूल कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, दुर्वांकुर सोसायटी परिसरात दलदल, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डुकरांचा वावर आणि खुल्या भूखंडांमध्ये सांडपाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे या परिसरात पाणीच पाणी झाले आहे. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कुचकामी ठरल्याने दहा ते बारा घरात पाणी शिरले आहे. तेथील कुटुंबांवर स्थलांतराची वेळ आली आहे. बहुतांश घरांना पाण्याने वेढा दिला आहे. मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचून आहे.

याविरोधात राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महिलांसह नागरिक रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी या दलदलीतच ठिय्या मारला. नगरसेवक राजू गवळी, बाळासाहेब गोंधळी, अलका पवार, माजी नगरसेवक हणमंत पवार यांनीही आंदोलनात भाग घेतला.
शाखा अभियंता आर. डी. सूर्यवंशी यांना प्रशासनाच्यावतीने आंदोलनस्थळी पाठविण्यात आले. नागरिकांनी सूर्यवंशी यांना सिद्धिविनायक कॉलनी परिसरात पाण्यातच उभे केले. नागरिकांनी थेट उपायुक्त, आयुक्तांना संपर्क साधला. तुम्ही येऊन परिस्थिती पाहा, आम्ही काय नरकयातना भोगतो, हे पाहून उपाययोजना सुरू करा, त्याशिवाय सूर्यवंशी यांना सोडणार नाही, असा पवित्रा घेतला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी उपायुक्त सुनील पवार यांना शामरावनगरला पाठविले. पवार यांना दलदलीत फिरवून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर गवळी, गोंधळे यांच्यासह अधिकाºयांनी ड्रेनेज ठेकेदारावर आगपाखड करीत मुरुम टाकण्याचे आदेश दिले. तात्काळ दोन जेसीबी, दोन डंपरच्या साहाय्याने मुरुमीकरण सुरू करण्यात आले. नाल्याचे सांडपाणी बाहेर काढणे, तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा काढण्यासही प्रारंभ झाला.

आंदोलनावेळी सुधा हेगडे, शफिरा मकानदार, जन्नतबी मकानदार काशिबाई आडसुळे, सविता भंडारे, वर्षा क्षीरसागर, अलका तिवडे, मीना वारे, रहिना शेख, वंदना कांबळे, वैशाली काळे, शशिकला ओतारी, जुबेर मुल्ला, विनोद हेगडे, हणमंत कांबळे, तम्मा कांबळे, अरुण आडसुळे, विजय आडसुळे, राजू अळगुडगीकर, दत्ता माळगे आदी उपस्थित होते.

पाण्यात सापांचा वावर, मृत डुकरे
शामरावनगर परिसरात घाणीचे साम्राज्य आणि अडगळीमुळे डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अशातच गुरुवारी अनेक ठिकाणी डुकरे मरून पडली होती. सुमारे शंभरहून अधिक डुकरे पाण्यात पडून दुर्गंधी पसरली होती. महापालिका प्रशासनाने तत्काळ दोन डंपर भरून ही डुकरे हटविली. अधिकाºयांच्या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सापही दिसले. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. महिलांनी तर महापालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात शिव्यांची लाखोली वाहिली.

Web Title:  Officials from Revolving Mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.