शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या कात्रीला धारच जास्त, हिशोब देताना अधिकारी बेजार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:05 IST

बीएलओंना अर्धाच भत्ता

कोल्हापूर : देशात, राज्यात दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने कोट्यवधीने होणाऱ्या शासकीय निधीची उधळपट्टी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने लावलेल्या कात्रीला जरा जास्तच धार लावली आहे. विधानसभेला किरकोळ स्टेशनरीपासून पिशव्यांपर्यंत, कर्मचाऱ्यांच्या जेवणापासून ते कंत्राटदारांची बिले भागविण्यापर्यंतच्या खर्चाच्या रकमांचा हिशोब देताना अधिकारी बेजार झाले आहेत. ही पहिली निवडणूक असेल जी इतक्या गरिबीत पार पडली असे काही अधिकाऱ्यांचे मत आहे. यामुळे काही मतदारसंघांतील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना भत्तादेखील अर्धाच निघाला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारांप्रमाणेच निवडणूक आयोगाचा खर्चही मोठ्या प्रमाणात होतो. कोल्हापुरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा खर्च प्रत्येकी ४० कोटी इतका आहे. निवडणुकीवरील हा खर्च कमी करण्यासाठी यंदा आयोगाने भली मोठी कात्री लावल्याचा अनुभव ही यंत्रणा राबविणाऱ्या जिल्हा प्रशासनाला आला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आयोगाने जिल्हा प्रशासनाने मागितलेल्या सर्व साहित्यांचे क्रॉस चेक केले आहे.इतके साहित्य का हवे, इथपासून मग हा खर्च कमी करा, तो खर्च कमी करा अशी सूचना येत होती. निवडणुकीच्या काळात काही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांच्याकडील नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी, पोलिसांसाठीच्या एकवेळच्या जेवणालादेखील कात्री लावाली लागली. त्यांना घरून डबा आणण्यास सांगितले गेले होते. त्यामुळे निवडणुकीचा खर्च करताना आणि त्याचा हिशोब देताना अधिकारी बेजार झाले आहेत.

साहित्यांचा हिशोबलोकसभा निवडणुकीला जे साहित्य वापरले गेले त्यातील प्रत्येक वस्तूचा हिशोब आयोगाने घेतला आहे. त्यावेळी उरलेले साहित्य, पिशव्या यावेळी विधानसभेला वापरण्यास सांगितले गेले. आयोगाने दिलेल्या साहित्यापैकी कोणतेही साहित्य कमी असेल तर ते कमी का आहे याचाही खुलासा देण्यास सांगितले आहे. आता विधानसभा पार पडली आहे, त्यातून राहिलेले अगदी पेन, स्टेपलर, दोरी, सिलिंग असे सगळे साहित्य आयोगाने परत पाठवून देण्यास सांगितले आहे.

बीएलओंना अर्धाच भत्तानिवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना ८०० रुपये भत्ता देण्यात आला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात ही पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. तर शेजारच्याच कोल्हापूर दक्षिणमध्ये मात्र ४०० रुपये त्यांना रोखीने देण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केल्यावर समजले की, उरलेला भत्तादेखील निधी उपलब्ध झाला की दिला जाणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग