शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणारा विद्युत वितरण कंपनीचा कार्यालयीन सहायक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:02 IST

वाणिज्य प्रकारातील विद्युत जोडणी बंद करुन कुळाच्या नावे नवीन विद्युत जोडणी करण्यासाठी साडेपाच हजार रुपयाची लाच घेणारा शेंडा पार्क विद्युत वितरण कंपनी शाखा कार्यालयातील कनिष्ठ कार्यालयीन सहायक जीवन महादेव कांबळे (वय-30) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आज सापडला.

ठळक मुद्देलाच घेणारा विद्युत वितरण कंपनीचा कार्यालयीन सहायक जाळ्यात कांबळे यांनी साडेपाच हजार रुपयाची केली मागणी

कोल्हापूर : वाणिज्य प्रकारातील विद्युत जोडणी बंद करुन कुळाच्या नावे नवीन विद्युत जोडणी करण्यासाठी साडेपाच हजार रुपयाची लाच घेणारा शेंडा पार्क विद्युत वितरण कंपनी शाखा कार्यालयातील कनिष्ठ कार्यालयीन सहायक जीवन महादेव कांबळे (वय-30) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आज सापडला.तक्रारदार प्रमोद नारायण कदम (रा. जवाहरनगर हौसिंग सोसायटी) यांना घरामध्ये असणाऱ्या जोडणीचे वाणिज्य वापरासारखे वीज बील येत होते. म्हणून तक्रारदार यांनी वीज मीटरच्या वापरात बदल करण्यासाठी कांबळे यांची भेट घेतली.

वाणिज्य प्रकारातील मीटर बंद करुन त्या ठिकाणी भाडेकरुच्या नावे नवीन जोडणी घ्यावी लागेल असे सांगून कांबळे यांनी साडेपाच हजार रुपयाची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने 26 सप्टेंबर रोजी येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 27 तारखेला शासकीय पंच साक्षीदारांच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता साडेपाच हजार रुपये मागितल्याचे निष्पण झाले.शेंडा पार्क येथील कार्यालयात लावण्यात आलेल्या सापळयात साडेपाच हजार रुपये स्विकारल्यानंतर कांबळे याला रंगेहात पकडण्यात आलं. पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलीस नाईक नवनाथ कदम, मयुर देसाई, सुरज अपराद या पथकाने ही कारवाई केली.लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, संपर्क क्रमांक 0231-2540989, 9011228333 टोल फ्रि हेल्पलाईन 1064 आणि 7875333333 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर