सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर; पोलिसांत तक्रार

By Admin | Updated: October 26, 2014 00:05 IST2014-10-26T00:03:36+5:302014-10-26T00:05:45+5:30

कोल्हापूर : माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावरून

Offensive text from social media; Complaint against the police | सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर; पोलिसांत तक्रार

सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर; पोलिसांत तक्रार

कोल्हापूर : माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जात आहे. लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार कागल पंचायत समितीचे उपसभापती भूषण पाटील व सोनाळीचे सरपंच सत्यजित पाटील यांनी आज, शनिवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली.
दिवाळीच्या धामधुमीत सर्व नागरिक आनंदोत्सव साजरा करीत असताना माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रकृतीसंदर्भात काही समाजकंटकांनी व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवरून लोकांच्या मनामध्ये गैरसमज व संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांना मानसिक धक्का बसला. प्रत्येकाने फोनवरून मंडलिक यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. दरम्यान, कागल पंचायत समितीचे उपसभापती भूषण जयवंतराव पाटील व सोनाळी (ता. कागल) येथील सरपंच सत्यजित बाळासाहेब पाटील यांनीही लेखी तक्रार केली.

Web Title: Offensive text from social media; Complaint against the police