पालकमंत्र्यांबाबत अक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:24 IST2021-05-10T04:24:45+5:302021-05-10T04:24:45+5:30
कोल्हापूर : अक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करून पालकमंत्री सतेज पाटील यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात ...

पालकमंत्र्यांबाबत अक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
कोल्हापूर : अक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करून पालकमंत्री सतेज पाटील यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हर्षवर्धन पोवार (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) असे त्या संशयिताचे नाव आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोकूळची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्याचा आधार घेत पालकमंत्री सतेज पाटील यांची बदनामी करण्याच्या हेतूने संशयित हर्षवर्धन पोवार याने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. ती पोस्ट पालकमंत्री पाटील यांचे स्वीय सहायक सागर राणे यांच्या निदर्शनास आली. त्या आधारे सागर येवलुजे यांनी रविवारी याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयित हर्षवर्धन पोवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.