शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आॅनलाईन औषधविक्री करणाऱ्या ‘अ‍ॅग्रो’ कंपनीवर गुन्हा : सदाभाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 18:13 IST

राज्यात बेकायदेशीररीत्या अनेक औषध कंपन्या कीटकनाशकांची राजरोस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश विभागीय कृषी सहसंचालकांना दिल्याची माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशेतीच्या डॉक्टरांवर होणार कारवाई : सदाभाऊ खोत यांची माहिती विभागीय कृषी सहसंचालकांना त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश ‘आत्मा’ कार्यालयात निविष्ठा व गुणनियंत्रण आढावा बैठक धाडीसाठी पथके तयारमान्यताप्राप्त औषधेच विक्री कराकर्जमाफीचे पैसे आठवड्यात

कोल्हापूर : राज्यात बेकायदेशीररीत्या अनेक औषध कंपन्या कीटकनाशकांची राजरोस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली येथील अ‍ॅग्रो कंपनी टोल फ्री नंबर देऊन कीटकनाशकांचे आॅनलाईन बुकिंग करीत आहे. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश विभागीय कृषी सहसंचालकांना दिल्याची माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. स्वत:च्या गाडीत औषधे टाकून शेतीचे डॉक्टर गावोगावी फिरत असून, अशांवरही लवकरच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री खोत यांच्या अध्यक्षतेखाली निविष्ठा व गुणनियंत्रण आढावा बैठक शुक्रवारी ‘आत्मा’ कार्यालयात झाली. यावेळी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खोत म्हणाले, यवतमाळ येथील विषबाधेची झालेली घटना दुर्दैवी असून तेथील शेतकऱ्यानी कोणती औषधे वापरली, फवारणीसाठी कोणते पंप वापरले यांची माहिती घेऊन संबंधित कंपन्यांवर कारवाई केली आहे. जादा फवारा देणारे पंप बाजारात आले असून त्यावर बंदी घातली जाईल. कर्नाटकातून ‘डीआयओ-३०३’ हे कीटकनाशक विक्रीसाठी येत असून, या कंपनीवरही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

आढावा बैठकीत विभागातील ३७५८ बियाणे दुकानांपैकी २९४९ दुकानांची तपासणी करून १५०९ दुकानांतील बियाण्यांचे नमुने घेतले. त्यांपैकी १० नमुने अप्रमाणित आढळले आहेत. खत व औषधे दुकानांचीही तपासणी केली असून त्यामध्ये अनुक्रमे १५४ व ७ अप्रमाणित नमुने आढळले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी उमेश पाटील, बसवराज मास्तोळी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, आदी उपस्थित होते.

कर्जमाफीचे पैसे आठवड्यातबॅँकांकडून माहिती येण्यास विलंब होत आहे. ज्या बॅँकांची माहिती येईल, त्या शेतकºयांना तातडीने पैसे दिले जातील. येत्या आठवड्यात शेतकºयांच्या खात्यावर पैसे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे खोत यांनी सांगितले.

धाडीसाठी पथके तयारजिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, गुणनियंत्रक यांचे पथक, जिल्हा अधीक्षक कार्यालयांतर्गत तालुका कृषी अधिकाºयांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. विभागीय सहनिबंधकांना सोबत घेऊन काही ठिकाणी आपण कंपन्या व दुकानांवर धाडी टाकणार, त्याबरोबर शेतकºयांच्या भेटी घेणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

मान्यताप्राप्त औषधेच विक्री कराकृषी विभागाने दिलेल्या परवान्यांत ज्या औषधांच्या विक्रीस परवानगी दिली आहे, त्याच औषधांची विक्री करावी. ती सोडून अथवा बंदी असणाºया औषधांची विक्री केली तर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे खोत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत agricultureशेती