शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

सीमा भागातील शैक्षणिक संकुलासाठी जागा ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST

कोल्हापूर : सीमा भाग हा महाराष्ट्राचा भाग असल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलासाठी महिनाभरात जागा ताब्यात घेण्यात येणार ...

कोल्हापूर : सीमा भाग हा महाराष्ट्राचा भाग असल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलासाठी महिनाभरात जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. यावर लवकरात लवकर बांधकाम करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री सामंत हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सीमा भाग महाराष्ट्राचाच असल्याने तेथील विद्यार्थ्यांची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने येथे कौशल्य विकासावर आधारित शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाने संस्थेचे नाव ठरवून त्यासाठी भाड्याने जागा घेतली आहे. येथे विविध प्रकारच्या पाच कोर्सेसना मान्यता देण्यात आली असून, अन्य कर्मचारी व पाच प्राध्यापकांची भरतीदेखील करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी या संकुलासाठी शासनाकडून जागा घेण्यावर चर्चा झाली होती. जागेची पाहणी झाली असून, महिनाभरात त्याचा ताबा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यावर कशा पद्धतीने बांधकाम करायचे याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले जाईल.

--

महाविद्यालये बंद होणार हा गैरसमज

मंत्री सामंत म्हणाले, सीमा भागातील आर्ट, कॉमर्स, बीएस्सीची महाविद्यालये बंद होणार, असा गैरसमज झाला होता किंवा तो पसरवला गेला असेल; पण शासनाचा असा कोणताही विचार नाही, उलट तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहाेत.

---

बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी ३ कोटी

शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी आम्ही ५० लाखांची घोषणा करून १ कोटीपर्यंत निधी देऊ असे जाहीर केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अध्यासनासाठी ३ कोटी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यापुढचे पाऊल टाकत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनमधून ग. गो. जाधव अध्यासनासाठी ५० लाखांचा निधी दिला आहे. शासनाकडूनदेखील जे ५० लाख देण्यात येणार आहेत, त्या निधीबाबतदेखील पुढील १०-१२ दिवसांत निर्णय होईल.

--