महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:16 IST2020-12-07T04:16:59+5:302020-12-07T04:16:59+5:30
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी शहरातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांतर्फे अभिवादन करण्यात ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी शहरातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांतर्फे अभिवादन करण्यात आले. यानिमित्त बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना घेण्यात आली. अनेक वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे, माजी नगरसेवक आदिल फरास, ‘आरपीआय’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, बाळासाहेब भोसले, विश्वासराव देशमुख, सुभाष देसाई, दगडू भास्कर, माकपचे चंद्रकांत यादव, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : ०६१२२०२०-कोल-आंबेडकर अभिवादन पालकमंत्री
ओळी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर, महापालिका प्रशासक तथा आयुक्त कादंबरी बलकवडे, आदी मान्यवर उपस्थित होते.