ईदनिमित्त ‘गोकुळ’ची उच्चांकी १५.२५ लाख लिटर्सची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:43+5:302021-07-22T04:16:43+5:30
(फोटो-२१०७२०२१-कोल-विश्वास पाटील) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) बुधवारी बकरी ईदनिमित्त आतापर्यंतच्या ...

ईदनिमित्त ‘गोकुळ’ची उच्चांकी १५.२५ लाख लिटर्सची विक्री
(फोटो-२१०७२०२१-कोल-विश्वास पाटील)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) बुधवारी बकरी ईदनिमित्त आतापर्यंतच्या एक दिवसाच्या विक्रीचा उच्चांक गाठला. तब्बल १५ लाख २५ हजार लिटर विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २ लाख ६३ हजार विक्रीत वाढ झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.
‘गोकुळ’ने उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. विक्रीमध्ये नवीन मानदंड प्रस्तापित करताना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असून हे उद्दिष्ट दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासाहर्ततेवर साध्य करू, असा विश्वास अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला. या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक, दूध संस्था ग्राहक वितरक व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्यामुळे ते कौतुकास पात्र असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याकडून अभिनंदन
‘गोकुळ’च्या व्यवस्थापनाने दूध विक्रीसाठी उत्कृष्ट काम केले असून उच्चांकी विक्री केल्याबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यवस्थापनाचे अभिनंदन केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.