चर खुदाईमुळे वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:14+5:302021-02-11T04:26:14+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : कोतोली-नांदगाव रस्त्याच्या कडेने एका नामांकित दरध्वनी कंपनीच्या चर खुदाईमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. कोट्यवधी ...

Obstruction of traffic due to variable excavation | चर खुदाईमुळे वाहतुकीला अडथळा

चर खुदाईमुळे वाहतुकीला अडथळा

पोर्ले तर्फ ठाणे : कोतोली-नांदगाव रस्त्याच्या कडेने एका नामांकित दरध्वनी कंपनीच्या चर खुदाईमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता चर खुदाईमुळे खराब होत असल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या दालमिया कारखान्याचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे रस्त्याला ऊस वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेने एका नामांकित दूरध्वनी कंपनीने चर खुदाई करून केबल पुरण्याचा खटाटोप सुरू केला आहे. चर खुदाईने रस्त्याच्या दर्जावर परिणाम होऊन रस्ता लवकर खराब होणार आहे. रस्त्याच्याकडेला नुसतीच चर खुदाई सुरू आहे. चर बुजविण्यात दिरंगाई होत आहे. कारखाना आणि वर्दळीचा रस्ता असल्याने चर खुदाईमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या कामाकडे बांधकाम विभागाचा अधिकारी फिरकला नसल्याचे कामाच्या दिरंगाईवरून दिसत आहे.

Web Title: Obstruction of traffic due to variable excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.