शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा, इशाऱ्यानंतर हटवण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:43 IST

राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा येत आहे. पाटबंधारे विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर हा भराव हटवण्याचे काम सुरू झाले.

ठळक मुद्देनदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळापाटबंधारेच्या कारवाई इशाऱ्यानंतर बावडा पुलाचा भराव हटवण्याचे काम झाले सुरू

रमेश पाटीलकसबा बावडा: राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या नदीपात्रातील भरावामुळे प्रवाहास अडथळा येत आहे. हा भराव त्वरित हटवावा अशी मागणी पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. तरीही ठेकेदार कंपनीने हा भराव काढण्याकडे दुर्लक्ष केले होते. शुक्रवारी या बाबत पाटबंधारे विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर हा भराव हटवण्याचे काम सुरू झाले.राजाराम बंधारा येथे गेल्या अडीच वर्षांपासून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी नदीपात्रात भर घालण्यात आली आहे. सध्या बंधाऱ्यातून खालील बाजूस पाणी सोडण्यात आले आहे. मात्र हे सोडलेले पाणी नदीपात्रात असल्याने भरीमुळे तटून पाण्याला फुगी येत आहे.

या सततच्या फुगीमुळे बंधाऱ्यातील काही मोरीच्या तळातील लोखंडी प्लेटा काढण्यात अडथळा येत आहे. तसेच पुराच्या वेळी पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन पुराचे पाणी शहरात घुसण्याची शक्यताही असल्याने हा भराव काढणे गरजेचे असल्याचे पाटबंधारे विभागाचे मत आहे. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी कळवले होते.दरम्यान सध्या पाटबंधारे विभागाला राधानगरी,तुळशी आणि कुंभी या जलाशयामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावयाचा आहे. त्यासाठीही ही भर अडथळा ठरत आहे. ही भर काढून घ्या असे वारंवार सांगूनही संबंधित ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केले होते.

आज याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. बांदिवडेकर, शाखा अभियंता प्रवीण पारकर यांनी दुपारी बाराच्या सुमारास प्रत्यक्ष राजाराम बंधारा येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बंधाऱ्यातील भरावामुळे पाण्याला फुगी येत असल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या लोकांना याबाबत कडक शब्दात सूचना दिल्या. तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम त्वरित न झाल्यास कारवाई करा अशा सूचना केल्या.या आदेशानंतर ठेकेदार कंपनीने जेसीबी, डंपरच्या सहाय्याने हा भराव हटवण्याचे कामास सुरुवात केली. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होईल. पावसाळ्यानंतर पुलाचे काम जेव्हा परत सुरू होईल, तेव्हा ठेकेदार कंपनीला नदीपात्र पुन्हा भराव घालावा लागणार आहे. 

टॅग्स :riverनदीDamधरणpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर