ग्रामपंचायत अध्यक्षपदाच्या आरक्षणाचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:51+5:302021-01-08T05:17:51+5:30

निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून २७ ग्रामपंचायतींमध्ये ४९७ नूतन सदस्यांची निवड झालेली आहे. तालुक्यात ४९८ ...

Observation of reservation for the post of Gram Panchayat President | ग्रामपंचायत अध्यक्षपदाच्या आरक्षणाचे वेध

ग्रामपंचायत अध्यक्षपदाच्या आरक्षणाचे वेध

निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून २७ ग्रामपंचायतींमध्ये ४९७ नूतन सदस्यांची निवड झालेली आहे. तालुक्यात ४९८ जागा होत्या पण ममदापूर येथील एका जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे ४९७ सदस्य निवडून आले आहेत. आता या सदस्यांना व सर्व मतदारांना शासनाकडून येणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत.

२७ डिसेंबरला निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते. ३० डिसेंबरला निकाल लागल्यानंतर अनेक ठिकाणी सत्तांतर झाल्याचे दिसून आले. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत युवावर्गाचा सहभाग लक्षणीय होता. निवडून आलेल्या सदस्यांना अध्यक्षपदाच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत. आरक्षण आल्यानंतर खऱ्या अर्थाने सत्ता कोणाची होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षविरहित झाले असल्याने सत्ता स्थापन करताना अनेक सदस्य वेगळी भूमिका घेणार आहेत. आता या सर्वांना अध्यक्षपदाच्या आरक्षणाचे वेध लागले असून तशी मोर्चेबांधणीही सुरू आहे.

Web Title: Observation of reservation for the post of Gram Panchayat President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.