डीवायपी अभियांत्रिकीमध्ये वसुंधरा अभियानांतर्गत शपथ ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:31+5:302021-01-16T04:27:31+5:30
कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ...

डीवायपी अभियांत्रिकीमध्ये वसुंधरा अभियानांतर्गत शपथ ग्रहण
कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंधरा' या अभियानांतर्गत शपथ ग्रहण कार्यक्रम झाला.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विध्यार्थी, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पर्यावरणासंबंधी आपली जबाबदारी शपथ घेऊन व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी उपस्थितांना 'हरित' शपथ दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांनी आपल्या जन्मदिनी कमीत कमी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला.
या कार्यक्रमासाठी डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. अद्वैत राठोड, जिमखाना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद चौगुले, डॉ. राहुल पाटील, डॉ. सुनील रायकर,डॉ. एस. आर. तोडकर, प्रा. सौ. शताक्षी कोकाटे, प्रा. मनजीत जाधव, प्रा. सम्राट शिंदे, प्रा. सचिन जडगे, श्री. तुषार आळवेकर, स्वयंसेवक, विध्यार्थी, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिमखाना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र रायकर यांनी केले.