आजारी लहान मुलांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:45+5:302021-09-08T04:31:45+5:30
भोगावती : भोगावती आणि परिसरात लहान मुले आजारी पडण्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या ठिकाणी असणारे लहान ...

आजारी लहान मुलांची संख्या वाढली
भोगावती : भोगावती आणि परिसरात लहान मुले आजारी पडण्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या ठिकाणी असणारे लहान मुलांचे हॉस्पिटल सध्या हाऊसफुल्ल होऊन अॅडमिट असणाऱ्या रुग्णांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची वेळ येत आहे. लहान मुलांच्या या वाढत्या संख्येमुळे पालकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या लहान मुलांना ताप, खोकला, सर्दी ही प्राथमिक लक्षणे दिसून येत असली तरी संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे काही मुले गंभीर देखील होऊ लागली असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ पालकांच्यावर आलेली आहे. या मुलांच्यात कोरोनासारखा गंभीर आजार दिसून येत नाही. मात्र थंडी वाजून ताप भरणे आणि खोकला, सर्दी यासारखी लक्षणे संबंधित मुलांना जीवघेणी ठरू लागली आहेत. यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण होऊन पालकांच्यावर हतबल होण्याची वेळ आली आहे.
भोगावती येथे असणारे लहान मुलांचे हॉस्पिटल सध्या फुल्ल झालेली आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त गंभीर असणाऱ्या लहान मुलांना ॲडमिट करून घेण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी सोय करण्याची वेळ येत आहे. मात्र ज्यांची परिस्थिती सदन आहे असे पालक आपल्या पाल्यांना कोल्हापूरला खासगी रुग्णालयात रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही ठिकाणी सध्या शाळा आणि अनुषंगिक परीक्षा सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे या वाढत्या आजाराची भीती मनात घेऊन मुलांना शाळेला पाठवण्यासाठी मर्यादा येऊ लागल्या आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली आहे.