उपचाराखालील रुग्णांचा आकडा शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:24 IST2021-04-06T04:24:35+5:302021-04-06T04:24:35+5:30
इचलकरंजी : शहरात विविध बारा ठिकाणी पंधराजणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा ...

उपचाराखालील रुग्णांचा आकडा शंभरी पार
इचलकरंजी : शहरात विविध बारा ठिकाणी पंधराजणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये स्वामी समर्थनगर, इंडस्ट्रियल इस्टेट, पुजारी मळा येथील प्रत्येकी दोन, योगा आश्रममागे, साईट नं. १०२, आवाडे अपार्टमेंट, तीन बत्ती चौक, रिंग रोड, झेंडा चौक, संत मळा, जामदार मळा, सर्वोदयनगर या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत चार हजार २३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, तीन हजार ९३० जणांनी मात केली आहे. ११० जण उपचार घेत असून, १९७ वर मृत्यू संख्या स्थिर आहे.
शहरातून प्रशासनाची फेरी
इचलकरंजीत सोमवारपासून शासनाच्या रात्री आठ वाजता संचारबंदी या नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस व नगरपालिका प्रशासनाने शहरातून बंद पुकारत फेरी मारली. त्यामुळे व्यापारी वर्गासह किरकोळ विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही वेळातच सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला होता.