शिष्यवृत्तीत कोल्हापूर राज्यात ‘नंबर वन’
By Admin | Updated: July 18, 2015 00:59 IST2015-07-18T00:59:42+5:302015-07-18T00:59:57+5:30
श्रेयश देशमाने राज्यात प्रथम : चौथीत ‘ग्रामीण’मध्ये कापशीची प्रणाली, तर ‘शहरी’त कोल्हापूरचा हर्षवर्धन चौथा

शिष्यवृत्तीत कोल्हापूर राज्यात ‘नंबर वन’
कोल्हापूर : राज्य परीक्षा परिषदेतर्फे मार्च २०१५ मध्ये घेतलेल्या पूर्वमाध्यमिक आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत चौथीमध्ये ग्रामीण भागातून शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर कापशीची प्रणाली अधिक चांदणे (३०० पैकी २९६) हिने, तर सातवीत ‘ग्रामीण’मध्ये आजरा तालुक्यातील उत्तूर केंद्रशाळेतील श्रेयस रमेश देशमाने याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे यंदा राज्यात कोल्हापूर जिल्हा शिष्यवृत्तीमध्ये ‘नंबर वन’वर राहिला.
चौथीत द्वितीय क्रमांक शिवानी पाटील (कुडित्रे, ता. करवीर), प्रेरणा थोरबोले, वैभव गुरव (मुगळी, ता. चंदगड) आणि तृतीय क्रमांक दिग्विजय कुंभार (सरवडे, ता. राधानगरी), वृषभकुमार खाडे (सांगरूळ), चौथा क्रमांक गोजा लव्हटे, श्रद्धा पाटील (कोतोली), सानिका पाटील (नाधवडे), श्रेया खांडेकर (जीवन शिक्षण विद्यामंदिर, ता. पन्हाळा) यांनी मिळविला.
२२ मार्चला झालेल्या परीक्षेत चौथीसाठी जिल्ह्यातील ३३ हजार ६०५ विद्यार्थी बसले. त्यातील २० हजार ८२४ (६१.१७ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यातील ५९१ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. सातवीसाठी २५ हजार ३६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ११ हजार ९७१ ( ४७.२० टक्के ) उत्तीर्ण झाले. त्यातील ५९० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.
राज्यात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांचा समावेश गुणवत्ता यादीत केला जातो. चौथीमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ग्रामीणमधील १७६ पैकी २६, तर शहरीमधील ११९ पैकी सात विद्यार्थी आहेत. सातवीत ग्रामीणमधील १२१ पैकी ६७ आणि शहरामधील १०५ पैकी १८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहे.
चौथीत शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी व कंसात शाळा अशा : सानिका पाटील (नाधवडे, ता. भुदरगड), उत्कर्ष बुवा (केंद्रशाळा, गोटवडे, ता. पन्हाळा), विवेक जाधव (मांगेवाडी, ता. राधानगरी), प्रतीक चव्हाण (गारगोटी, ता. भुदरगड), ऐश्वर्या सारंग (केंद्रशाळा कूर, ता. भुदरगड), रविराज गोंगणे (चंद्रे, ता. राधानगरी), दर्शन खोत (कळंबवाडी, ता. शाहूवाडी), अच्युत पाटील (आरे, ता. करवीर), सम्राट गुरव (येळाणे, ता. शाहूवाडी), अद्वैता व्हरकट (पुष्पनगर, गारगोटी), प्रसाद धावडे (तिटवडे, ता. भुदरगड), वैष्णवी गुरव (वेसर्डे, ता. भुदरगड), माधुरी पाटील (बसर्गे, ता. चंदगड), मंगेश घावरे (चोपडेवाडी, ता. भुदरगड), आदित्य पाटील (व्हनाळी, ता. कागल), संकेत जाधव (शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज), आदित्य सुतार (गंगामाई, इचलकरंजी), शाल्वी मोहिते, पृथ्वीराज चौगुले (तेजसमुक्त विद्यालय, कोल्हापूर), दिग्विजय सस्ते (गंगामाई, इचलकरंजी), पूर्वा पाटील (श्रीराम विद्यालय, कोल्हापूर).
सातवी : राम लोकरे (धामणे, ता. आजरा), सुचिता जाधव (सावर्डे, ता. राधानगरी), सतेज पाटील (श्री परशराम बालाजी माध्यमिक विद्यालय, मुदाळ), श्वेता कुर्ले, सौरभ कुर्ले (निगवे दुमाला, ता. करवीर), पृथ्वीराज धारपवार, प्रतीक्षा धारपवार (लहान बार्वे, ता. भुदरगड), तेजस पुंडपळ (आर्दाळ, ता. आजरा), वृषभ कुर्ले (निगवे दुमाला), रोशन पाटील (व्हन्नाळी, ता. आजरा), रोहित पाटील (सेंट्रल, उत्तूर, ता. आजरा), महेश पिंपळे (परखंदळे, ता. शाहूवाडी), ऋतिका सावंत (श्री महालक्ष्मी, राधानगरी), प्रतीक चौगले (नेहरू, कोतोली, ता. पन्हाळा), सुहास देसाई (विद्यामंदिर लहान बार्वे), ओंकार गुलांबे (प्रायमरी सेंट्रल स्कूल, हेदवडे, ता. भुदरगड), अविनाश येजारे (लहान बार्वे), धनराज शेळके (जीवनशिक्षण विद्यामंदिर साळशी, ता. शाहूवाडी), प्रशांती पाटील (बेलवळे बुद्रुक, ता. कागल), ऋतुजा अंगठेकर (उंड्री, ता. पन्हाळा), वैष्णवी हसोळे (हमीदवाडा, कागल), अनुजा कदम (केंद्रशाळा ठिपकुर्ली), सुजाण धनवडे (बहिरेवाडी, ता. आजरा), केतन लोहार (धामणे, ता. आजरा), कृष्णा पेडणेकर (सावर्डे, ता. राधानगरी), सोमनाथ देवेकर (नवरसवाडी, ता. भुदरगड), सतेज काळेबेरे (कुमार, राधानगरी), प्रथमेश पाटील (जीवनशिक्षण मंदिर, अर्जुनवाडा, ता. राधानगरी), तनुजा वागरे (जीवनशिक्षण विद्यामंदिर, साळशी, ता. शाहूवाडी), रसिका गुरव (आर्दाळ, ता. आजरा), शुभम दळवी (परखंदळे, ता. शाहूवाडी), वैष्णवी आवदान (गुडेवाडी, ता. चंदगड), करण चौगले (हरपवडे, ता. पन्हाळा), साक्षी कोईगडे (केंद्रशाळा कुरुकली, ता. करवीर), वीरकुमार तसीलदार (राणी विजयादेवी हायस्कूल, कापशी), प्रथमेश भातले (धामणे, ता. आजरा), तानाजी पडवळ (केंद्रीय प्राथमिक शाळा, वेतवडे, ता. पन्हाळा), अनिकेत मांडे (सेंट्रल, उत्तूर), सौरभ पाटील ( उंड्री, ता. पन्हाळा), स्वाती पाटील (सावर्डे, ता. राधानगरी), सुशांत चव्हाण (सेंट्रल, उत्तूर), विश्वजित पाटील (जीवनशिक्षण मंदिर, अर्जुनवाड, ता. राधानगरी), किशोरी पडवळ (निगवे दुमाला), यशवर्धन पाटील, आशिष अर्जुनवाडकर (जीवनशिक्षण मंदिर, अर्जुनवाडा), स्नेहल शेणवी (वाळवे खुर्द, ता. कागल), आर्या पाटील (सेंट्रल प्रायमरी स्कूल, केनवडे, ता. कागल), सोहम पाटील (परशराम बाळाजी पाटील माध्यमिक विद्यालय, मुदाळ, ता. भुदरगड),ओंकार आवदान (गुडेवाडी, ता. चंदगड), शाहू किडगावकर (निगवे दुमाला), प्राजक्ता पाटील (वेसर्डे, ता. भुदरगड), अंकिता पसारे (लहान बार्वे), मिहीर धरणगुत्ती (सेंट्रल, उत्तूर), अभिषेक पाटील ( आदमापूर, ता. भुदरगड), वैष्णवी फराकटे (आमदार श्री नामदेवराव भोईटे विद्यालय, कसबा वाळवे, ता. राधानगरी), प्रियंका कुंभार ( हमीदवाडा, ता. कागल), श्रेयश लकांबळे (सेंट्रल, उत्तूर), आदिती इंगळे (लहान बार्वे), साक्षी जाधव (निगवे दुमाला), नीलेश आवदान (गुडेवाडी, ता. चंदगड), विराज निर्लेकर (पाराशर हायस्कूल, हातकणंगले), जिज्ञासा पुंडपळ (आर्दाळ), संकेत देसाई (साळगाव, ता. आजरा), सुयोग लोखंडे (श्री पार्वती शंकर, उत्तूर), संग्राम कांबळे (प्रायमरी सेंट्रल, हेदवडे). अनिष रजपूत (जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर, जयसिंगपूर), प्रथमेश मानदेवे (मुरगूड विद्यालय), प्राजक्ता सुतार (श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल, कोल्हापूर), सुमेध गोंगडे ( डीकेटीई हायस्कूल, इचलकरंजी), अभिषेक कुलकर्णी (पार्वती हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर), अभिषेक कबाडे (व्यंकटराव हायस्कूल, इचलकरंजी), तन्मय कुंभार (छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज), नविद मोमीन (श्री. बळवंतराव यादव हायस्कूल, हातकणंगले), साक्षी देमाने (सरस्वती हायस्कूल, इचलकरंजी), अनिकेत पाटील (सीताबाई पटवर्धन हायस्कूल, कुरुंदवाड), अर्थव खोत, पृथ्वीराज भोसले (लक्ष्मीनारायण मालू, जयसिंगपूर), आयुष शहा (प्रायव्हेट, कोल्हापूर), दीपाली जाधव (रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन, इचलकरंजी), प्राजक्ता चौगुले, संकेत तेरवाडे (डीकेटीई, इचलकरंजी), मोनिका चोथे (रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन, इचलकरंजी).
टक्केवारीत घसरण; पण...
गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णचे प्रमाण कमी असले तरी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी गुणवत्ता यादीत चौथीचे ३३, तर सातवीचे ५८ आणि यावेळी चौथीच्या ३३ व सातवीच्या ८५ विद्यार्थ्यांचा समावेश गुणवत्ता यादीत झाला आहे.
काठिण्यपातळी वाढविल्याने राज्याचा निकाल गेल्या वर्षापेक्षा कमी लागला आहे. तरीही राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल चांगला लागला आहे. गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे.
- सुभाष चौगुले,
प्राथमिक शिक्षणाधिकारी