सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १३५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:27+5:302021-02-16T04:26:27+5:30
कोल्हापूर : राज्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी दुपारी चार ...

सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १३५
कोल्हापूर : राज्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात १३५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी संध्याकाळी नवे नऊ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ८ नागरिकांचा समावेश असून शाहूवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहे. कुडाळ येथील ७० वर्षीय पुरुषाचा सोमवारी कोल्हापुरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २०० जणांची दिवसभरामध्ये तपासणी करण्यात आली असून ४६२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ७८ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे. राज्यातील काही भागामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.