नूलच्या गावसभेत डॉल्बी बंदीचा ठराव

By Admin | Updated: May 3, 2014 17:08 IST2014-05-03T13:23:35+5:302014-05-03T17:08:21+5:30

नूल (ता. गडहिंग्लज) येथे लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी तसेच ट्रॅक्टरवर टेपरेकॉर्डर लावणेस बंदी घालण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या गावसभेत घेण्यात आला.

Null's decision to ban the Dolby in the Govt | नूलच्या गावसभेत डॉल्बी बंदीचा ठराव

नूलच्या गावसभेत डॉल्बी बंदीचा ठराव

नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथे लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी तसेच ट्रॅक्टरवर टेपरेकॉर्डर लावणेस बंदी घालण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या गावसभेत घेण्यात आला.
महाराष्ट्र दिनानिमित्त सरपंच महादेव वडर यांच्या अध्यक्षतेखाली गावसभा झाली. सभेत गावात लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात लावण्यात येणार्‍या डॉल्बीमुळे ध्वनीप्रदूषण होते. मोठ्या आवाजाने हृदयरूग्णांना त्रास होतो. वरातीमुळे रात्रीची झोपमोडे होते. ट्रॅक्टरवरील टेपरेकॉर्डरवर वेगवेगळ्या अर्थांची गाणी मोठ्या आवाजाने वाजवली जातात. कर्णकर्कश आवाजाचा ग्रामस्थांना त्रास होत आहे. शिवाय चालकाचे नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अपघात घडतात. म्हणून डॉल्बी व टेपरेकॉर्डर लावणेस बंदी घालावी अशी मागणी करणारे निवेदन ११६ ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.
या निवेदनावर गावसभेत चर्चा होवून डॉल्बी व टेपरेकॉर्डर बंदीचा ठराव करण्यात आला. सभेस उपसरपंच मनोज कदम, आर. आर. पाटील, रवी माळगी, परशराम जाधव, प्रविण शिंदे, अशोक पाटील, कृष्णराव चव्हाण, पी. एम. चव्हाण, ए. के. जाधव, परशराम सरनाईक, भगवान सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
* प्रतिक्रिया
डॉल्बी बंदीचा गावसभेत ठराव झाला. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. हा निर्णय आम्ही काटेकोरपणे राबवणार आहे. तसेच ठरावाबाबत पोलिस स्टेशनला कळवणार आहे.
- महादेव वडर, सरपंच नूल.

 

Web Title: Null's decision to ban the Dolby in the Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.