नृसिंहवाडीला मिळणार नवीन नौका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:37+5:302021-06-09T04:29:37+5:30
बुबनाळ : आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व आलास जिल्हा परिषदेचे सदस्य परवीन पटेल यांच्या विशेष प्रयत्नातून नृसिंहवाडीसाठी नवीन ...

नृसिंहवाडीला मिळणार नवीन नौका
बुबनाळ : आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व आलास जिल्हा परिषदेचे सदस्य परवीन पटेल यांच्या विशेष प्रयत्नातून नृसिंहवाडीसाठी नवीन लाकडी नौका मंजूर झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल यांनी दिली.
२०१९ ला आलेला महापुरावेळी लाकडी नावेतून हजारो ग्रामस्थांना नावाडी अरुण गावडे व संजय गावडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले होते. नृसिंहवाडी येथे असणारी नौका जीर्ण होऊन खराब झाली होती. याबाबत जिल्हा परिषद सदस्या पटेल व नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने ठराव करून नृसिंहवाडीला तीर्थक्षेत्र असल्याने नवीन नौका द्यावी, अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्याकडे केली होती. जिल्हा परिषदेकडे याचा मंत्री यड्रावकर यांनी पाठपुरावा करून नृसिंहवाडीसाठी नौका मंजूर केली आहे. याबाबत नृसिंहवाडीचे माजी उपसरपंच अनंत धनवडे यांनी नृसिंहवाडीला नौका मिळाल्याने यात्रेकरूबरोबर येणा-या संभाव्य महापुरात मोठी मदत होणार असल्याचे सांगितले. यासाठी मंत्री यड्रावकर यांनी विशेष सहकार्य केल्याचे धनवडे यांनी सांगितले.
कोट - २००५, २००६ व २०१९ ला आलेल्या महापुरात लाकडी नौकामधून हजारो ग्रामस्थांना पुराचे पाणी वाढत असताना सुरक्षित ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने स्थलांतरीत केले होते. जुनी नौका खराब झाल्याने नवीन नौकाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे केला होता. आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर, जि. प. सदस्या पटेल, नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या प्रयत्नातून नवीन नौका मंजूर झाली आहे.
फोटो - ०८०६२०२१-जेएवाय-०४-परवीन पटेल