नृसिंहवाडीत मोजक्याच मानकऱ्यांच्या हस्ते कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST2020-12-25T04:21:01+5:302020-12-25T04:21:01+5:30

नृसिंहवाडी/ वार्ताहर श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त जयंती यात्रा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ...

In Nrusinhwadi, only a handful of dignitaries performed | नृसिंहवाडीत मोजक्याच मानकऱ्यांच्या हस्ते कार्यक्रम

नृसिंहवाडीत मोजक्याच मानकऱ्यांच्या हस्ते कार्यक्रम

नृसिंहवाडी/ वार्ताहर

श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त जयंती यात्रा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रद्द करण्यात आली आहे. दत्त मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्याच हक्कदार मानकरी मंडळींच्या उपस्थित होणार आहेत, अशी माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष अशोक जनार्दन पुजारी, सचिव गोपाळ अवधूत पुजारी यांनी गुरुवारी सायंकाळी दत्त देव संस्थानच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्वस्त विकास पुजारी, श्रीकांत पुजारी, गुंडो श्रीपाद पुजारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यापारी पेठा, दुकाने पूर्णपणे बंद राहून त्या दिवशी सायंकाळी होणारा श्री दत्त जन्मकाळ सोहळा हक्कदार व मानकरी यांच्या मोजक्या उपस्थितीत होणार आहे. जन्मकाळ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लोकल केबल व देवस्थानच्या युट्युब चॅनेलवर प्रसारित होणार असून कोणीही भाविकांनी त्यादिवशी नृसिंहवाडीमध्ये येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *संग्रहित फोटो कोलवर

Web Title: In Nrusinhwadi, only a handful of dignitaries performed