शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: आता सरकारला वाकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कोल्हापुरातील धरणे आंदोलनात मराठा समाजाचा इशारा

By भारत चव्हाण | Updated: October 2, 2023 15:48 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर वणवा उठला आहे. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची केवळ फसवणूक केली आहे. येथून पुढे ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर वणवा उठला आहे. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची केवळ फसवणूक केली आहे. येथून पुढे आरक्षण घेतल्याशिवाय, प्रसंगी सरकारला वाकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमवारी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी येथे झालेल्या धरणे आंदोलनावेळी दिला.कोल्हापूर शहरात पापाची तिकटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी हा इशारा देण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे गांधी जयंतीपासून आमरण उपोषणास बसणार होते, परंतु जालना येथील जरांगे पाटील यांना चाळीस दिवसांची मुदत दिली असल्याने आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करुन गांधी जयंती दिनी दोन तासाचे धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. प्रशांत देसाई, ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. नलवडे, ॲड. अजित मोहिते, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, दुर्वास कदम, डॉ. बुलबुले, वैशाली महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.राज्य शासन मराठ्यांना आरक्षण देणार असे सांगत असले तरी ते न्यायलयात टिकणारे नाही. शासन आम्हाला फसवतंय. आता आम्ही जागे आहोत. आम्ही शासनाला स्वस्थ बसून देणार नाही. उद्रके झाला आहे. त्याची सुरवात कोल्हापुरातून झाली आहे. येणारा काळ दाखवून देईल की सकल मराठा काय करु शकतो. शासनाला जाग्यावरुन हलविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आरक्षण आम्ही मिळवून दाखविणारच. टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी या शासनाला वाकविण्याची वेळ आली तर मराठा समाज शंभर टक्के शासनाला वाकवेल, असा इशारा बाबा इंदूलकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण